शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

गैरसमजुतीतून अपहरणाचा आरोप, तरुणीची मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 4:18 AM

नितीन कंपनी येथून विवियाना मॉलकडे रविवारी पहाटेच्या सुमारास रिक्षाने जात असताना चालक आपले अपहरण करत असल्याचा गैरसमज एका २२ वर्षीय तरुणीचा झाला.

ठाणे - नितीन कंपनी येथून विवियाना मॉलकडे रविवारी पहाटेच्या सुमारास रिक्षाने जात असताना चालक आपले अपहरण करत असल्याचा गैरसमज एका २२ वर्षीय तरुणीचा झाला. या तरुणीस विवियाना मॉलकडे जायचे होते. कोरम मॉलसमोरून गेल्यानंतर तोच विवियाना मॉल आहे, असा तिचा समज झाला. याच गैरसमजुतीमुळे रिक्षाचालकावर संशय घेत तिने मदतीची याचना केल्याची माहिती चौकशीत उघड झाली.रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास ही तरुणी तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी विवियाना मॉलकडे जाण्यासाठी नितीन कंपनी येथून संतोष सकट यांच्या रिक्षामध्ये बसली. रिक्षाने कोरम मॉल ओलांडल्यानंतर तिने आरडाओरडा करत रिक्षा थांबवण्यास सांगितले. हा प्रकार तिथून जाणाऱ्या हवालदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांच्या चॅनलवरून नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिली.त्यानंतर, घटनास्थळी राबोडी, वर्तकनगर आणि नौपाडा या तीन पोलीस ठाण्यांचे बीटमार्शल आले. तिला नौपाडा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी हा प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वागळे इस्टेट पोलिसांनी रिक्षाचालकासह तिची चौकशी केली. तिला विवियाना मॉलकडे जायचे होते. तिच्याकडे रिक्षाचेही पैसे नव्हते. तिचा मित्रच पैसे देणार असल्यामुळे विवियाना मॉलकडे तिला घेऊन जात होतो. पण, तिने अचानक आरडाओरडा केला. तिच्या अपहरणाचा किंवा इतर कोणताही उद्देश नसल्याचे या रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले.दरम्यान, या तरुणीची रिक्षाचालकाविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले. भल्या पहाटे अघटित होऊ नये, म्हणून वाहतूक शाखेच्या शिरसाठ यांनी तातडीने या तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर राबोडी, वर्तकनगर आणि नौपाडा पोलिसांचे बीटमार्शलही त्याठिकाणी मदतीसाठी आले. परंतु, नंतर या रिक्षाचालकाबाबत तिचा गैरसमज दूर झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या मुलीला सुरक्षारक्षक असलेल्या तिच्या वडिलांच्या ताब्यात दिल्याचेही पठाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणे