ठाणे - ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांना, तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी केली. तर, साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महेश केळुसकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. प्रदीप ढवळ, तर प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.जनकवी पी. सावळाराम पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. तर, गंगा-जमुना पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. साहित्यिक क्षेत्र तर शैक्षणिक आणि लक्षवेधी कलाकार म्हणून दिल्या जाणाºया पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे.सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला गायकवाड (पिंपळोलकर), क्र ीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक वेतकर, जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम पाटील ही मंडळी उपस्थित राहणार आहे.राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडणार असून यावेळी रंगाईनिर्मित जनकवी पी. सावळाराम यांच्या गीतावर आधारित धागा धागा अखंड विणू या... या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून रसिकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठामपाने केले आहे.रसिकांना मेजवानीरविवारी जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.गडकरी रंगायतनमध्ये हा समारोह रंगणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवाणी ठाणेकर रसिकांना मिळणार आहे.
रवींद्र साठेंना पी. सावळाराम, कुबल यांना गंगा-जमुना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:09 AM