- अजित मांडके ठाणे - आपण सगळ्यांचं भलं कर असं आपण देवाकडे मागणं करतो, दानवे यांनी जे वक्तव्य केलय कोणाचे वाईट कर या त्यांच्या मागण्या वरुन दानवेंची संस्कृती लक्षात येते असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्यात यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून काम केलं . तसेच काम यापुढे मी करीन असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात केलं.पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शंभूराज देसाई हे प्रथमच गुरुवारी ठाण्यात आले होते . यावेळी त्यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतलं .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करीन असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं . यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं आहे . त्यांनी जसं काम केलं आहे तसेच काम करण्याचा मी प्रयत्न करीन. ठाणे जिल्हा हा खूप मोठा आहे येथे काम करताना मुख्यमंत्री शिंदे ज्या सूचना देतील आणि जी दिशा दाखवतील तसेच काम करीन असं देसाई यांनी सांगितलं .
यावेळी देसाई यांना रश्मी ठाकरे याही गुरुवारी टेंभी नाका येथील देवीचं दर्शन घ्यायला येणार आहेत. याबाबत विचारलं असता . देवीचं दर्शन घ्यायला कोणालाच मनाई नाही. परंतु टेंभी नाक्याच्या देवीचा आशीर्वाद हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पहिल्यापासून राहिला आहे . आमची श्रद्धा आहे कि यापुढेही आम्ही आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य करतो आहे त्यालाच या देवीचा आशीर्वाद कायम राहील असं देसाई यांनी स्पष्ट केलं .