शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

ठाणे तलावांचे नाही, तर हातगाड्यांचे शहर; फेरीवाल्यांवरून महासभेत प्रशासनावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 12:59 AM

कापूरबावडीपासून रस्त्यावर हातगाड्या उभ्या असताना त्यांच्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप देवराम भोईर यांनी यावेळी केला.

ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर राहिले नसून हातगाड्यांचे शहर झाल्याचे सभागृहास सांगून संबंधित सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत महापालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत व्यक्त केली. शहरात मोठ्या  प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू  असून, त्यावरदेखील कारवाई होत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलताना प्रशासन अशा हातगाड्यांवर कारवाई करत नसेल तर आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू, असा इशाराच त्यांनी दिला. या लक्षवेधीवर शिवसेना नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनीदेखील फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले.

कोट्यवधींचे खर्च करून पालिका पदपथ बनवते. मात्र, त्यावर फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी केली. हातगाडीवर कारवाई करताना एखाद्या नारसेवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फोन केल्यास ही बाब रेकॉर्डवर आणावी, याला आपले समर्थन असल्याचे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाजूला अतिक्रमण विभागाची गाडी असूनही कारवाई होत नाही तर अनेक वेळा केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते.  स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात बसणारे फेरीवाले ठाण्याच्या बाहेरचे असल्याचे भाजपचे नगरसेवक सुनश जोशी यांनी सांगितले. रस्त्यावरच्या गाड्या हा केवळ अतिक्रमणाचा विषय नाही तर पदपथांवर चालताना नागरिकांना व्यवस्थित चालता आले पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, असे संदीप लेले यांनी सांगितले. स्टॉलदेखील चुकीच्या जागेवर दिले जात असल्याचे सांगून फेरीवाल्यांना अर्ज मागवून तो दहा वर्षे ठाणेकर असावा ही अट टाकावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

कापूरबावडीपासून रस्त्यावर हातगाड्या उभ्या असताना त्यांच्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप देवराम भोईर यांनी यावेळी केला. प्रभाग समितीकडूनही अशा फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका