ठाणे: वाघबीळ येथील उड्डाणपूलावरुन ठाणो ते घोडबंदर मार्गावरुन जाणारा ट्रक खड्डयात आदळला. त्यामुळे ट्रकमधील माल खालून जाणाऱ्या कारवर कोसळून कारचालक दीपक कनावजे (27) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.वाघबीळ उड्डाणपूलावरुन 3 ऑक्टोंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने कागदी पुठ्ठयांचा माल घेऊन हा ट्रक जात होता. हा ट्रक उड्डाणपूलाच्या निम्म्या भागापासून पुढे आला असतांना एका खड्डयात तो आदळला. त्यातच ट्रकच्या पाठीमागचा भाग बाजूला झाला. त्यामुळे ट्रकमधील पुठ्ठयाचा माल हा रस्त्यावरुन जाणा:या एका कारवर पडल्याने कारमधील पुठय़ाचे आठ ते नऊ मोठे बॉक्स खाली रस्त्यावरुन मीरा रोडकडे जाणा:या कारवर कोसळले. यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून कारचालक दीपक कनावजे (27, रा. दहिसर मोरी) आणि प्रशांत देवरकोंडा (38, रा.मीरा रोड, ठाणो) हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दीपकचा मृत्यु झाला. दीपक हा दहिसर मोरी येथील कृष्णागिरी इम्पॅक्ट या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणन नोकरीला होता. हयगयीने ट्रक चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सहादेव पालवे यांनी सांगितले.अपघातानंतर घटनास्थळी मोठया प्रमाणात ‘बघ्यां’ची गर्दी उसळली होती. यात अनेकजण अपघाताचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपण्यात गुंतले होते. त्यामुळे कासारवडवली पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवितांना मोठया अडचणी निर्माण झाल्या होत्या. या मार्गावरील वाहतूक ही सेवा रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे रात्री 12 नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.
ठाण्यात उड्डाणपूलावरून जाणाऱ्या ट्रकमधील माल खाली कोसळला; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 1:23 AM