ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली खाजगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. सुमारे १६ हजार ५४६ प्रवेशांसाठी पालकांनी केवळ दहा हजार ८३९ अर्ज आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. यात वाढ करण्यासाठी ७ मार्चपर्यंत पालकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ैठेवले आहेत. या जागांवर केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलाना प्रवेश दिला जात आहे. २८ फेब्रुवारीच्या मुदतीत १८ हजार ३७४ अर्ज आले आहेत. त्यातील सात हजार ५३५ प्रवेश अर्ज चुकीच्या पध्दतीने आॅनलाइन दाखल केल्याचे आढळून आले. यामुळे ते बाद ठरवण्यात आले आहेत. उर्वरित दहा हजार ८३९ प्रवेश अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. या प्रवेश अर्जानुसार जरी पाल्यांना ठिकठिकाणच्या शाळेत प्रवेश दिले तरी देखील जिल्ह्याभरातील शाळांमध्ये पाच हजार ७०७ प्रवेश रिक्त राहणार आहेत. या जागांवर देखील वेळेत प्रवेश देणे शक्यव्हावे म्हणून एक आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली.केजी ते पहिलीच्या वर्गात दर्जेदार शिक्षण देणाºया शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी वेबसाईटवर यंदा ७ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे. निश्चित केलेल्या ६४० शाळांमध्ये १६ हजार ५४६ विद्याथ्याचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना तर पहिलीच्या वर्गासाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीई अंतर्गत आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी पालकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आतापर्यंत नवीमुंबईतील एक हजार ३०४ सर्वाधिक अर्ज चुकीचे आढळून आले. या खालोखाल स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावरील ठाणे महापालिकेतील पालकांनी एक हजार ७२ अर्ज चुकीचे भरले आहेत. एवढेच नव्हे तर कल्याण डोंबिवलीतील पालकांनी देखील ५६७ अर्ज चुकीचे दाखल केले आहेत. तर बेदखल म्हणून दोन हजार ९५४ अर्जासह जिल्ह्यातील सात हजार ५३५ प्रवेश अर्ज शिक्षण विभागाने बाद केले आहेत. या बद प्रवेश अर्जाना ग्राह्य धरण्यात येणार नाही. यासाठी पालकांनी वाढीव मुदतीतीचा लाभ घेऊ त्वरीत प्रवेश अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे....................पालकांनी अर्जाची प्रिंटकॉपी जवळ ठेवावी- आॅनलाइन अप्लिकेशन फार्म योग्य पध्दतीने भरल्यानंतर स्क्रीनवर त्वरीत ‘जनरेट पीडीएफ’ असे आॅफशन येईल. त्यावर क्लिक करून अर्जाची प्रिंटकॉपी काढून पालकांनी ती स्वत:कडे सांभाळून ठेवणे अपेक्षित आहे. चुकीचे अर्ज दाखल केलेल्या पालकांना आॅनलाइन प्रिंटकॉपी काढता आलेली नसेल. या पालकांनी पुन्हा दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातीला आरटीईच्या साडे सोळा हजार आरक्षित शाळा प्रवेशांसाठी केवळ ११ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 5:00 PM
जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ैठेवले आहेत. या जागांवर केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलाना प्रवेश दिला जात आहे. २८ फेब्रुवारीच्या मुदतीत १८ हजार ३७४ अर्ज आले आहेत. त्यातील सात हजार ५३५ प्रवेश अर्ज चुकीच्या पध्दतीने आॅनलाइन दाखल केल्याचे आढळून आले
ठळक मुद्दे* प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ * साडे सात हजार अर्ज बादआॅनलाइन अप्लिकेशन फार्म योग्य पध्दतीने भरल्यानंतर स्क्रीनवर त्वरीत ‘जनरेट पीडीएफ’ असे आॅफशन येईल. त्यावर क्लिक करून अर्जाची प्रिंटकॉपी काढून पालकांनी ती स्वत:कडे सांभाळून ठेवणे