- नारायण जाधव, ठाणेठाणे आणि पालघरमधील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्तेबांधणीसाठी नगरविकास विभागाने ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांची भरीव मदत केली आहे. दोन टप्प्यांत हे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित नगरपंचायतींसह नगरपालिका आणि महापालिकांना दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे शासनाची काही थकबाकी तर नाही ना, असेल तर ती कापून हे अनुदान वितरीत करावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित नगरपालिका आणि महापालिकेने रस्तेबांधणीसाठीच ते वापरावयाचे असून ई-निविदेद्वारे विकास आराखड्यात प्रस्तावित रस्त्यांच्या बांधकामांसाठीच ती वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना नगरविकास विभागाने २४५ कोटी सहा लाख ३० हजार रुपये मंगळवारी वितरीत केले आहेत. त्यातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला हे ११ कोटी ४१ लाख ७५ हजार ७१५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कुणाला किती निधी मिळाला?शहापूर नगरपंचायत०४ लाख ४२ हजार ७७४जव्हार नगरपरिषद०४ लाख ५८ हजार ६६०मुरबाड नगरपंचायत०८ लाख तीन हजार ३५डहाणू नगरपरिषद१९ लाख १५ हजार ६६६पालघर नगरपरिषद२६ लाख २५ हजार ८६५मीरा-भार्इंदर महापालिका३४ लाख ३३ हजार ८६४नवी मुंबई महापालिका४७ लाख ५४ हजार २९वसई-विरार महापालिका५१ लाख ८६ हजार १०८कल्याण-डोंबिवली महापालिका५२ लाख ९१ हजार ९०६कुळगाव-बदलापूर६६ लाख ३७ हजार ८० ठाणे महापालिका७८ लाख १२ हजार ६९१अंबरनाथ९६ लाख ५६ हजार ४४ रुपयेभिवंडी महापालिकातीन कोटी ३० लाख १० हजार ८२२उल्हासनगर महापालिकातीन कोटी २१ लाख ४७ हजार १७०
ठाणे, पालघरचे रस्ते होणार चकचकीत
By admin | Published: November 19, 2015 12:12 AM