ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये चालू असलेल्या पोलीस शिपाई पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी परीक्षा ३ एप्रिल रोजी घेण्यात आली असून या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मंगळवार १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता मैदानी चाचणीच्या ठिकाणी साकेत पोलीस मैदान,ठाणे येथे आयोजीत करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी सकाळी ४ वाजता हजर रहावे.
परीक्षेस सोबत येताना मैदानी चाचणीसाठी दिलेले ओळखपत्र व लेखी परीक्षेसाठी महाऑनलाईन कडून देण्यात आलेले प्रवेश पत्र (सायबर कॅफेतून प्रिंट करून ) मैदानावर न चुकता घेऊन यावे .उमेदवाराकडे ओळखपत्र व प्रवेशपत्र नसल्यास अशा उमेदवारांस लेखी परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही .
परीक्षेसाठी पात्र ठरलेल्याची यादी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मैदानी चाचणीचा निकाल ठाणे पोलीस वेबसाईट www.thanepolice.gov.inयावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याची ठाणे पोलीस भरतीस आलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) तथा ठाणे शहर पोलीस भरती अध्यक्ष मकरंद रानडे यांच्या वतीने करण्यात आले आहे