शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

ठाणे पोलिसांनी नष्ट केले दहा कोटींचे अमली पदार्थ; ५० लाखांच्या अफिमचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 9:45 PM

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ठाणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दीड कोटींच्या ३० किलो ७७३ ग्रॅम चरससह तब्बल दहा कोटींचे अमली पदार्थ ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी नष्ट केले. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने तसेच न्यायालयाच्या मान्यतेने तळोजा एमआयडीसी येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या मदतीने ठाणे पोलिसांनी ही कार्यवाही केली.अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या १५ वर्षांमध्ये अमली पदार्थ विरोधी कारवाया करून या पदार्थाची साठवणूक, विक्री आणि ते बाळगल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले होते. यात गांजा, चरस आणि ब्राऊनशुगरसह विविध प्रकारचा अमली पदार्थ जप्त केलेला होता. यातील १९ पोलीस ठाण्यांमधील ९१ गुन्ह्यांमधील ९७४ किलो ८२४ ग्रॅम १०९ मिलीग्रॅम इतक्या वजनाचा अमली पदार्थ २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट केला आहे. यात सुमारे दीड कोटींचे चरस आणि ५० लाखांच्या अफिमचाही समावेश होता.अशी झाली कारवाई-अमली पदार्थ- दाखल गुन्हे - मुद्देमालाचे वजनगांजा- ५४- ९३८ किलो १६१ ग्रॅम ७३ मिली ग्रॅमचरस- २४- ३० किलो ७७३ ग्रॅम ५ मिलीग्रॅमगर्द- ०९ - ३ किलो १४१ ग्रॅम २४ मिलीग्रॅम

ब्राऊनशुगर - १- १३८ ग्रॅमहेरॉईन - १- ४०६ ग्रॅममेन्ड्रॉक्स पावडर- १- ४७३ ग्रॅम ७ मिलीग्रॅमअफीम - १- १ किलो ७३२ ग्रॅम

अमली पदार्थ विरोधी पथकाने १६ मे २०१५ रोजीच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार जप्त केलेला अमली पदार्थ नष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयाचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांची मुद्देमाल नाश समिती स्थापन केली होती. समितीच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिनकर मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, गिरीश बने आणि सहायक पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.