शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

ठाणे पोलिसांनी उतरवली २१४३ तळीरामांची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:29 AM

८० अधिकाऱ्यांचा सहभाग; ४७० चालकांवर भरणार न्यायालयात खटले, तीन दिवसांमध्ये केली धडक कारवाई

ठाणे : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणाºया एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षी मात्र केवळ एका दिवसांत दोन हजार ७१ तळीरामांवर कारवाई झाली होती.थर्टी फर्स्ट साजरी करण्याच्या धुंदीत अनेक तळीराम हे बेदरकारपणे वाहन चालवितात. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भन्नाट वेगाने जाणाºया वाहनांच्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. तर, गंभीर जखमी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्वही येते. सर्वाेच्च न्यायालयानेही किमान १० टक्के रस्ते अपघात कमी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी २९ ते ३१ डिसेंबर २०१९ तसेच १ जानेवारी २०२० च्या पहाटेपर्यंत राबविलेल्या विशेष मोहिमेत १८ युनिटमार्फत मोक्याच्या नाक्यांवर मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.५४ श्वासविश्लेषक यंत्रांचा वापर२९ आणि ३० डिसेंबर रोजी ४७० मद्यपी वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार खटले भरण्यात आले. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण या विभागात वाहतूक उपशाखेने ही मोहीम राबविली. यासाठी ५४ श्वासविश्लेषक (ब्रिथ अ‍ॅनालायझर) यंत्रांचाही वापर केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.येथे होती नाकाबंदी : पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या अधिपत्याखाली चार उपविभागांतील सुमारे ८० अधिकाºयांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. ठाण्यातील नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, कासारवडवली, कापूरबावडी, राबोडी आणि वागळे इस्टेट या युनिटच्या तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, आनंद नगरनाका, कोपरी, माजिवडा जंक्शन, गोल्डन डाइजनाका आदी ठिकाणीही तपासणी झाली. तर, कल्याण उपविभागातील कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी या युनिटमधील महामार्ग, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, दूधनाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागांत अनेक वाहनाचालकांना पकडण्यात आले. तसेच भिवंडीतील वंजारपट्टीनाका, धामणकरनाका आणि शिवाजी चौक या भिवंडी, नारपोली आणि कोनगाव युनिटच्या कारवाईतही पोलिसांनी अनेकांची झिंग उतरविली. उल्हासनगरासह विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांत नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांना पकडले.मद्यपींची पोलिसांशी हुज्जतचारही विभागांतील ९० मुख्य नाक्यांवर ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ ते १ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांनी किती प्रमाणात अल्कोहोल घेतले, याची चाचपणी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांशी मद्यधुंद वाहनचालकांनी हुज्जत घालून कारवाईत अडथळे आणण्याचेही प्रकार केले.दंडवसुलीऐवजी थेट खटला : पूर्वी अशा मद्यपी वाहनचालकांकडून दंड वसूल केला जायचा. कालांतराने संबंधित वाहनचालक हा न्यायालयात गेल्यानंतर त्याचा दोन हजारांचा दंड कमी होऊन उर्वरित रक्कम त्याला परत केली जात होती. परंतु, दंड भरल्यानंतर कोणीही न्यायालयात जात नव्हते. त्यामुळे आता दंड आकारण्याऐवजी संबंधित मद्यपींवर खटला दाखल करून त्यांचे वाहन जप्त केले. वाहन जप्त केल्यामुळे ते सोडविण्यासाठी या तळीरामांना न्यायालयात जावे लागते. तिथे परवाना निलंबन तसेच दंडात्मक कारवाईदेखील होते. या कारवाईच्या भीतीपोटी मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर मोठा आळा बसला आहे.- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहरअशी झाली कारवाई : ३१ डिसेंबर २०१९ रोजी वाहतूक शाखेने केलेल्या १८ युनिटपैकी सर्वाधिक २७८ तळीरामांवर मुंब्य्रात कारवाई झाली. त्यापाठोपाठ कासारवडवलीमध्ये २२०, डोंबिवली- १३४, नारपोली-१२०, कळवा- १०५ तर वागळे इस्टेटमध्ये १०३ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर्षी ३१ डिसेंबर रोजी १६७३ तर २९ आणि ३० डिसेंबर या दोन दिवसांत ४७० अशी दोन हजार १४३ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.१८ युनिटने राबविली मोहीमगेल्या वर्षी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १८ युनिटने राबविलेल्या ३१ डिसेंबरच्या मोहीमध्ये दोन हजार ७१ जणांविरुद्ध कारवाई केली होती. यंदा हे प्रमाण ३९८ ने कमी झाले आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण काही प्रमाणात का होईना, कमी झाल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.