शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लग्न समारंभातून चोरीस गेलेले ४२ तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 6:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने ...

ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कामगिरी १९ लाखांचे दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने थेट मध्यप्रदेशातील एका गावातील चोरटयांच्या घरातून हस्तगत करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी दिली. यातील आरोपींचा अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘जलसा लॉन’ येथे अनिता सिंग यांच्या मुलाचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी विवाहसोहळा सुरु होता. त्यावेळी नवरा नवरी बरोबर रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोटो काढले जात असतांना अनिता यांनी खुर्चीवर ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग अवघ्या काही क्षणांमध्ये तिथून चोरीस गेली होती. या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह, दोन मोबाईल आणि ९० हजारांची रोकडही होती. याप्रकरणी १ डिसेंबर २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनिता यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक जयराज रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहादेव पालवे, पोलीस हवालदार उदय कोरे, राजेंद्र चौधरी आणि पोलीस नाईक तुषार पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे थेट मध्यप्रदेशातील राजगढ जिल्हयातील गुलखेडी गावातून अट्टल चोरटा बबलू सिसोदिया याचे घर शोधले. बबलूने त्याच्या अन्य दोन साथीदार तसेच एका दहा वर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले. बबलूचे नाव यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या मध्यप्रदेशातील घरात २० डिसेंबर २०२० रोजी अचानक झडती घेऊन पालवे यांच्या पथकाने चोरीस गेलेल्या एक लाख ५७ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल ४२३ ग्रॅम वजनाचे १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे जवळपास सर्वच सोन्याचे दागिने हस्तगत केले. चोरीतील दोन मोबाईल आणि ९० हजारांची रोकड मात्र या झडतीमध्ये मिळाली नाही. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर बबलूसह त्याचे साथीदार मात्र तिथून पसार झाले. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास डॉ. राठोड यांनी व्यक्त केला.* अल्पवयीन मुलाचा चोरीसाठी वापर:अवघ्या दहा वर्षांच्या मुलाच्या मदतीने या आंतरराज्य टोळीने लग्नसमारंभातून सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग लंपास केली. पकडले गेलेच तर अल्पवयीन मुलाचा समावेश असल्यामुळे प्रकरण फारसे पुढे जात नाही. याचाच गैरफायदा घेऊन यात मुलाचा वापर केल्याची बाब समोर आली. मुलाने बॅग ताब्यात घेतल्यानंतर बाहेर आधीच तयारीत असलेले हे टोळके एका वाहनातून पळून गेले होते. मध्यप्रदेशातील गुलखेडी या गावात बहुसंख्येने असे चोरटे असल्याचीही बाब तपासात समोर आली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीGoldसोनं