शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांची आता ‘फूट - पेट्रोलिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 8:25 PM

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे

ठाणे, दि. 18  : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संकल्पनेतून या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

पायी गस्त घालण्यामुळे दृश्य पोलिसींग राहणार असून नागरिक आणि पोलीस यांच्यात थेट संवाद निर्माण होण्यास अधिक मदत होणार आहे. अलिकडेच मुबई पोलिसांनी सायकलवरील गस्त सुरु केली आहे. त्याच धरतीवर ठाणे पोलिसांनी ही ‘फूट पेट्रोलिंग’ची संकल्पना अमलात आणली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दिवसातील ठराविक वेळेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह काही अधिकारी आणि कर्मचारी हे गस्त घालणार आहेत. यामध्ये संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालय, मार्केट परिसराचा भाग निवडला जाणार आहे. ठाण्यात शनिवार पासून वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रामचंद्रनगर आणि ज्ञानेश्वरनगर भागात गस्त घालून या योजनेची सुरुवात केली. रविवारी वागळे इस्टेट भागातील आंबेवाडी तर सोमवारी अंबिकानगर भागात त्यांच्या पथकाने गस्त घातली. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या नविन संकल्पनेचे स्वागत करुन काही गाºहाणीही त्यांच्याकडे मांडल्या.

पोलीस आणि जनता यांचे नातेही यातून दृढ होण्यास मदत होणार असल्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नाक्यावर, शाळा, कॉलेज आणि मार्केट परिसरात फिरणारी टवाळखोर मुले यांच्यावरही अंकुश राहणार असून पाकिटमार, सोनसाखळी चोर यांच्यावरही यातून लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.

‘‘ पायी पेट्रोलिंगमुळे पोलिसांना परिसराची अधिक व्यापक प्रमाणात ओळख होईल. नागरिकांमध्येही पोलिसांमुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ‘फूट- पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. यामध्ये एक निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि साते ते आठ कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडली तर तात्काळ पोलीसही उपलब्ध होणार आहेत.’’सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे 

 

टॅग्स :Policeपोलिस