शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाणे पोलिसांनी वर्षभरात हस्तगत केले एक कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:31 AM

७६ तस्करांना अटक : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई, ‘एलएसडी’ही जप्त

जितेंद्र कालेकर 

ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये केटामाइन, एनएसडी पेपर, चरस तसेच मेफेड्रॉन आदी अमली पदार्थांचा एक कोटी १३ लाख ४० हजार २७८ रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत केला. त्याची तस्करी करणाऱ्या ७६ तस्करांना अटक केली आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या विविध पथकांनी मिळून एक कोटी ७६ लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात १९१ गुन्ह्यांमध्ये २८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून वर्षभर नियमित कारवाया करण्यात येतात. अनेकदा मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तर प्रदेश येथून मुंब्रा, भिवंडी, अंबरनाथ, कल्याणमधील दुर्गाडी परिसर आणि ठाण्यातील येऊर- उपवन आदी भागांमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे आढळले आहे. दोन वर्षांपूर्वी पोखरण रोडवर एमडी पावडरची तस्करी करताना मिळालेल्या दोन तरुणांच्या चौकशीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूरच्या एमआयडीसीत छापा टाकून इफे ड्रीनचा मोठा साठाच हस्तगत केला होता. गेल्या वर्षभरात पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून २०१९ मध्ये १९ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा सुमारे ८५ किलो गांजा हस्तगत केला. यात पाच गुन्ह्यांमध्ये सात जणांना अटक केली.एलएसडी या नवीन अमली पदार्थाची तस्करी करणाºया सात जणांना अटक केली. एका कारवाईमध्ये एकाकडून २३ एलएसडी पेपर आणि ९७० ग्रॅम चरस असा तीन लाख ९५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.दुसºया छाप्यात पाच आरोपींकडून १०६३ एलएसडी पेपर, ५८ ग्रॅम एमडी पावडर आणि ६.४ ग्रॅम चरस असा ६२ लाख ८१ हजार ६४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. तिघांकडून १२ ग्रॅम एमडी आणि १९ ग्रॅम केटामाइन असा एक लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय, १४ जणांकडून २१ लाख ५३ हजार ३०८ रुपयांचा गुटखाही या पथकाने जप्त केला.संपूर्ण आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी वर्षभरात १९१ गुन्ह्यांमध्ये285आरोपींनाअटक केले. त्यांच्याकडून एक कोटी ७६ लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.२०१८ मध्ये १७९ जणांना अटकजानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १०२ गुन्हे दाखल झाले. यात १७९ आरोपींना अटक झाली. त्यांच्याकडून तीन कोटी ३२ लाख ८१ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात एक कोटी ४५ लाखांच्या पाच किलो स्युडो इफेड्रीन, २० लाख ३० हजारांच्या मेफेड्रॉनचाही समावेश होता. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस