शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अवघ्या पाच तासांमध्ये ठाणे पोलिसांनी हस्तगत केली दोन कोटींची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:06 PM

मुंबईतील व्यापा-याला सहा कोटींचे कर्ज देण्यासाठी त्याच्याकडून दोन कोटींची सुरक्षा अनामत रक्कम घेऊन पसार झालेल्या विनोदकुमार झा (४८) आणि अमितकुमार यादव (२६) या दोघांनाही खंडवा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने खंडवा (मध्यप्रदेश) येथून अटक केली. अवघ्या पाच तासांमध्ये त्यांच्याकडून फसवणूकीतील दोन कोटींची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफसवणूक करणाऱ्या दोघांना खंडवा येथून घेतले ताब्यातठाणे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील व्यापा-याला सुमारे सहा कोटींची कर्जाऊ रक्कम देण्याच्या नावाखाली सुरक्षा अनामत म्हणून दोन कोटींची रक्कम घेऊन मध्य प्रदेशात पसार झालेल्या विनोदकुमार झा (४८) आणि अमितकुमार यादव (२६, रा. दोघेही दरबंगा, बिहार) या दोघांनाही खंडवा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी अटक केली आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या पाच तासांमध्येच ही कारवाई केल्यामुळे या व्यापाºयाने समाधान व्यक्त केले आहे.मुंबईतील मालाड येथील रहिवासी अक्षय परवडी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात १२ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. विनोदकुमार झा याने सहा कोटींचे कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून बँकेत सुरक्षा अनामत ठेवण्यासाठी दोन कोटींची रक्कम घेतली. ती बँकेत भरणा करण्याचा बहाणा करून आरटीजीएसची पावती आणून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन कोटींची रक्कम घेऊन ती त्याचा साथीदार अमितकुमार याच्याकडे दिली. त्यानंतर, ठाणे रेल्वेस्थानकातून दोघेही पसार झाले. याप्रकरणी परवडी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हे दोघेही ठाणे रेल्वेस्थानकातून पवन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून बिहारच्या दिशेने प्रवास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने काढली. फसवणुकीची माहिती १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मिळाल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेली माहिती खंडवा रेल्वे पोलिसांना ठाणे पोलिसांनी दिली. त्यानुसार, ही पवन एक्स्प्रेस खंडवा रेल्वेस्थानकात रात्री १० वाजता येताच म्हणजे अवघ्या पाच तासांमध्येच या दोघांनाही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन कोटींच्या रोकडसहित पकडले. या दोघांनाही १३ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांना अटक केली. त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* पाच तासांसाठी करोडपतीविनोदकुमार झा आणि त्याचा साथीदार अमित हे दोघेही पाच तासांसाठी करोडपती झाले होते. तोपर्यंत या पैशांमध्ये कायकाय करायचे, याचे त्यांनी अनेक मनसुबे आखले होते. परंतु, खंडवा रेल्वेस्थानकात रेल्वे थांबल्यानंतर त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले..............................*गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंदया फसवणुकीची तक्रार १२ फेब्रुवारी रोजी ठाणे गुन्हे शाखेकडे आली. याची तत्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सूत्रे हलविली. विशेष म्हणजे या फसवणुकीची तक्रार आरोपींच्या अटकेनंतर १३ फेब्रुवारी रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी