लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खारेगाव टोलनाका मार्गे मुंब्रा भागात जाणाºया ट्रकमधून तब्बल ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाखांचे चरस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतेच जप्त केले. याच प्रकरणाची धागेदोरे जम्मू काश्मीरमधील पुलवामापर्यंत लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी ठाणे पोलिसांना आता काश्मीर पोलिसांचीही मदत घ्यावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून चरस या अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, सहायक पोलीस निरीक्षक मिलीन पिंगळे आणि उपनिरीक्षक गिरीश गायकवाड आदीं १५ जणांच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी हा संशयित ट्रक मुंबई पुणे नाशिक राष्टÑीय महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे सापळा लावून पकडला. या ट्रकमधून चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाºया मुज्जफर अहमद शहा (३४, चालक) आणि इरफान अहमद शहा (३०, क्लिनर) या दोघांनाही ९ सप्टेबर रोजी अटक करण्यात आली. हे दोघेही काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवाशी असून त्यांनी हे चरस कोणाकडून आणले ते कोणाला दिले जाणार होते. याची त्यांनी कोणतीच माहिती तपास पथकाला दिलेली नाही. मात्र, ज्या हे चरस ज्याने मुंब्रा येथे नेण्यासाठी दिले, त्याने केवळ एक व्यक्ती मुंब्रा येथे गेल्यावर तुम्हाला भेटेल. त्याने सांकेतिक भाषेत इशारा केल्यानंतरच त्याच्याकडे हा ‘माल’ सुपूर्द करायचा, असे ठरले होते. मात्र, संबंधित व्यक्ती या ट्रककडे येण्यापूर्वीच ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने इशारा देऊन या ट्रकला थांबविले. इतक्या मोठया प्रमाणात असलेले अंमली पदार्थांचा ट्रक पकडण्यासाठी मोठी जोखीम होती. याच ट्रकमध्ये हत्यारांसहित टोळी असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, १५ जणांच्या टीमने सापळा लावून ही मोहीम यशस्वी केल्याचे यातील एका अधिकाºयाने सांगितले.* पुलवामा येथील या चरस तस्करीचे कनेक्शन तपासण्यासाठी ठाणे पोलिसांना आता काश्मीर पोलिसांचीही मदत घ्यावी लागणार आहे. त्याच आधारे मुंब्रा आणि पुलवामा हे चरस तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताही पोलीस सूत्रांकडून वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने मुंब्रा येथील खबरे आणि काश्मीरमधील अन्य तांत्रिक विश्लेषणांचाही आधार घेण्यात येत आहे. गरज पडली तर काश्मीरला जाऊनही या प्रकरणाचा तपास करावा लागेल असेही एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.
तीन कोटींच्या चरस प्रकरणात ठाणे पोलिसांना घ्यावी लागणार काश्मीर पोलिसांची मदत
By जितेंद्र कालेकर | Published: September 11, 2020 11:30 PM
मुंब्रा भागात जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाखांचे चरस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतेच जप्त केले. याच प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी ठाणे पोलिसांना आता काश्मीर पोलिसांचीही मदत घ्यावी लागणार आहे.
ठळक मुद्देपुलवामा कनेक्शनमुख्य सूत्रधाराचा शोध सुरुचठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई