शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
3
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
4
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
5
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
6
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
7
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
8
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
9
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
10
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
11
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
12
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
13
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
14
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
15
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
16
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
17
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
19
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
20
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय काला

By अजित मांडके | Published: September 06, 2023 6:15 PM

Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

- अजित मांडकेठाणे  - दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्यानुसार शिंदे गटाने नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात विचारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दुसरीकडे आता ठाकरे गटाने नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत विचारे यांचा व्हिडीओ मॉब करुन दाखविण्यात आल्याचा दावा करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गट विरुध्द ठाकरे गटात राजकीय काला रंगल्याचे दिसून आले.

ठाण्यातील टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंडीचे आयोजन करण्यात येत असते. तर, टेंभीनाका येथून अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावरील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला.

मंगळवारी रात्री शिंदे गटाने नौपाडा पोलीस ठाण्यात विचारे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले. तर बुधवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. शिंदे गट विचारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आगेकुच करीत असतांना ठाकरे गटान बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी खासदार राजन विचारे यांचा व्हिडीओ मॉब करुन दाखविण्यात आल्याने बदनामी केल्याच्या विरोधात संबधींतावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच वायरल होणाºया व्हिडीओची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे अधिकारी किरण जाधव यांच्यासह इतर युवासैनिकांनी केली आहे. याशिवाय नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात आणि वरीष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनात घोषणा देणाºयांच्या विरोधातही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेDahi HandiदहीहंडीShiv Senaशिवसेना