शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By मुरलीधर भवार | Published: June 22, 2023 3:35 PM

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

- मुरलीधर भवार

कल्याण - ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ््यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.एकात्मिक परिवहन व्यवस्थेची भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांनी यापूर्वीच घेतली होती. कल्याण डोंबिवलीच्या पहिवहन समितीचे माजी सभापती राजेश कदम यांनी देखील हीच भूमिका ते सभापती असताना घेतली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम हा आर्थिक तोट्यात आहे. उल्हासनगरला परिवहन सेवा नाही. भिवंडी महापालिकेकडेही परिवहन सेवा उपक्रम नाही. अंबरनाथ आणि बदलापूर पालिका हा उपक्रम चालवू शकत नाही. केवळ ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांचे परिवहन उपक्रम सक्षम रित्या सुरु आहेत.

एकच परिवहन सेवा केल्यास जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगररपालिका हद्दीतील नागरीकांना सार्वजनिक वाहतूकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. महानगर निगम प्राधिकरण स्थापन झाल्यास त्यातून बस सेवेचे रस्त्यावरील संचलन वाढीस लागून खाजगी वाहतूकीसाठी आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रदूषण आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सूटका होण्यास मदत होऊ शकते. सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी एकात्मिक परिवहन सेवेत सहभागी होण्याचे ठराव करुन सरकार दरबारी पाठविले आहेत. या ठरावाची अंमलबजावणी सरकारकडून केली जावे याकडे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात लवकर सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे असे सांगितले.

पाण्याचा कोटा वाढवून मिळण्याची मागणी२७ गावातील नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ज्या प्रमाणे गावातील नागरीकांना पाणी कमी दाबाने मिळते. ती स्थिती बड्या गृहसंकुलाची आहे. गोळवली, दावडी, नांदिवली या पट्ट्यात पाणी कमी येते. ही समस्या लक्षात घेता खासदार शिंदे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ््यांसाेबत बैठक झाली. या बैठकीस राजेश कदम, प्रफुल्ल देशमुख, बंडू पाटील उपस्थित होते. लांबलेला पावसाळा पाहता पाण्याचे नियोजन करुन एमआयडीसीने पाण्याचे वितरण सम प्रमाणात करावे. पाण्याचा दाब वाढवावा. त्याचबरोबर पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी खासदार शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे