ठाणे : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील विविध भागातील नाल्यांमध्ये पडून बेपत्ता झालेल्यांपैकी दीपाली बनसोडेसह (२७) अन्य दोघींचे मृतदेह गुरुवारी हाती लागले. गुरुवारी सहा तासांच्या अंतराने कळवा येथील विटावा खाडीतून त्यांचे मृतदेह ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढले, त्यामुळे मृतांची संख्या सहा झाली आहे.वागळे इस्टेट, नितीन कंपनी येथील कोरम मॉलजवळील नाल्यात दीपाली मंगळवारी कोसळली होती. त्यातच ती बुडाल्याने तिचा गेल्या तीन दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह विटावा खाडीजवळ स्थानिक रहिवाशांना आढळला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने तिचा मृतदेह बाहेर काढला. ओळख पटल्यानंतर तो नातेवाइकांना देण्यात आला.त्यानंतर संध्याकाळी आणखी एका मुलीचा मृतदेह विटावा खाडीजवळ आढळला. जवाहरबाग अग्निशमन दलाच्या जवानांनी ृखाडीमध्ये बोटीने जाऊन तो बाहेर काढला. तो संभाजीनगर भागातील नाल्यात पडलेल्या गौरी जयस्वालचा (१४) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अन्य एका युवकाचा मात्र तिसºया दिवशीही शोध सुरूच आहे.
ठाण्यात पावसाचे बळी; मृतांची संख्या ६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:11 AM