ठाणे : ठाणे महापालिकेने मंगळवार पासून कोरोना बाबतीतील नियम शिथील करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा ८ ठिकाणी नियम कडक असतील असे जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी पुढील १५ जून पर्यंत कडक लॉकडाऊन असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये लोकमान्य नगर - सावरकरनगर प्रभाग समितीमधील काही भाग, कळवा आणि उथळसर आणि वागळेतील काही भागांचा समावेश किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक निर्बंध असतील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. शहरात आतापर्यंत १ लाख २८ हजार ८६९ करोना रु ग्ण आढळून आले आहेत. पैकी १ लाख २५ हजार ३६० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे प्रमाण ९७.२८ टक्के एवढे आहे. तर १ हजार ९१५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच सद्यास्थितीत शहरात १ हजार ५९४ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.सध्या ८ कन्टेन्मेंट झोनमहापालिका क्षेत्नातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कन्टमेंट झोन म्हणून जाहीर केले होते. या इमारती तसेच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जात होती. परंतु आता ती संख्या देखील खाली आल्याचे दिसत आहे. त्यानुसार शहरात सद्यस्थितीत अवघे ८ कन्टेनमेंट झोन शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये ३ ठिकाणी, कळव्यात दोन ठिकाणी, उथळसर दोन आणि वागळेतील एका ठिकाणी कन्टेमेंट झोन असणार आहे. त्यानुसार या भागात येत्या १५ जून पर्यंत निर्बंध असतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे : कन्टेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम; शहरातील आठ ठिकाणी असणार नियम लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:10 PM
नियम शिथिल करण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगपालिकेनं उचललं पाऊल. परंतु कन्टन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार.
ठळक मुद्देनियम शिथिल करण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगपालिकेनं उचललं पाऊल.कन्टन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार.