- जितेंद्र कालेकर ठाणे - वर्तकनगर, सावरकरनगर भागात दाेन गटांमध्ये दंगल झाली असून त्याठिकाणी जादा कुमक पाठवा, असा मेसेज आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाेलिसांना मिळाला. त्यानंतर तातडीने याठिकाणी पाेलिसांसह सर्वच यंत्रणा तातडीने रवाना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी ५.३० ते ६.३० या दरम्यान झालेल्या या माॅक ड्रीलने ठाण्यातील नागिरकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण हाेते. परंतू, पाेलिसांनीच या माॅकड्रीलचा खुलासा केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये १ ऑक्टाेंबर राेजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दंगल सदृश्य घटनेची माहिती देण्यात आली. ज्ञानोदय शाळेजवळ, सावरकरनगर, येथे दोन गटांमध्ये दंगल झाल्याची ही माहिती देण्यात आली हाेती. ही माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस ठाण्यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी , टी.डी.आर.एफ. जवान , अग्निशमन दलाचे जवान आणि पाेलिसांचे दंगल निवारण पथकही दाखल झाले हाेते. या सर्व यंत्रणांची यानिमित्त अशीच एखादी घटना घडल्यास सतर्कतेबाबत रंगीत तालीम घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.