शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ठाणे आरटीओचा महसूल आलेख वाढता वाढता वाढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:22 AM

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसुलाचा मागील तीन वर्षांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. त्यातच, २०१७-१८ या वर्षात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने १३८८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसुलाचा मागील तीन वर्षांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. त्यातच, २०१७-१८ या वर्षात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने १३८८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. सर्वाधिक महसूल जमाठाणे उपविभागाने केला असून तो ६२४ कोटी पाच लाख इतका आहे. हा महसूल जीएसटीने लागू झालेल्या दोन टक्के कर आणि त्यातच दुचाकीच्या वाढत्या नोंदणीमुळे उंचावला. राज्यात ठाणे आरटीओने महसूल वसुलीत दुसरा क्रमांक पटकावल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.ठाणे आरटीओ विभागांतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ठाणे, कल्याण, नवीमुंबई आणि वसई असे चार उपविभाग आहेत. त्यानुसार, २०१५-१६ मध्ये ठाणे आरटीओने १०७४.०२ कोटी महसूल जमा केला होता. तर, २०१६-१७ या वर्षी १२४०.३३ तर, २०१७-१८ या वर्षभरात ठाणे आरटीओने १३८८.०२ कोटी महसूल जमा झाला आहे. ११२.८१ वाढलेला महसूल जीएसटीमुळे सरसकट लावलेल्या वाहनखरेदीवरील दोन टक्के करामुळे वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.>मुंबईतील वाहनांची नोंदणी मुंबईतजकातीमुळे मुंबईतील बहुतेक चारचाकी वाहनांची नोंदणी ठाणे आरटीओ विभागात केली जात होती. ती आता जकात बंद झाल्यानंतर जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे ठाणे आरटीओचे फारसे असे काही नुकसान नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.>२४ कोटींची दंडवसुलीआरटीओच्या सुमारे १५ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाते. वाढलेला महसूल जीएसटीमुळे सरसकट लावलेल्या वाहन खरेदीवरील दोन टक्के करामुळे वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.यामध्ये ठाणे उपविभागातून १३ कोटी ५५ लाख, कल्याण तीन कोटी ४१ लाख, वसई तीन कोटी ३० लाख आणि नवीमुंबईतून तीन कोटी ५६ लाख दंड आकारला आहे.>आरटीओचा तीन वर्षांचा महसुली तक्ताउपविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ठाणे ५१६.८२ ५८५.५७ ६२४.०५कल्याण १५५.८५ २००.११ २५५.८२वसई १६२.०१ २११.८६ २३९.००नवीमुंबई २३९.३६ २४२.७९ २६९.१५एकू ण १०७४.०२ १२४०.३३ १३८८.०२>आॅनलाइनद्वारे कागदांची बचतआॅक्टोबर २०१७ पासून आरटीओचा कारभारआॅनलाइन सुरू झाला. त्यानुसार, ३१ हजार ६९१ जणांनी आॅनलाइनद्वारे ३७ कोटी ७१ हजार रुपये भरले आहेत. तसेच वाहनाच्या निगडित कामासाठी ८१ हजार ८७३ नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे तेवढ्याच पावत्यांसाठी लागणाºया कागदांची बचत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>दुचाकींची नोंदणी ७० ते ७२ वाढलीयापूर्वी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जकातवसुली केली जात होती. मात्र, जकात बंद करून जीएसटी कर लागू करण्यात आला. ही जीएसटी वाहनखरेदी-नोंदणीच्या वेळी आरटीओच्या पथ्यावर पडली आहे. त्यातून आरटीओच्या तिजोरीत सरसकट दोन टक्के करवसुली केल्याने भर पडली आहे. या वर्षात ७० ते ७२ टक्के दुचाकी, १५ ते २० टक्के कारखरेदी झाल्याने त्यांच्याकडून दोन कर वसूल केले आहे. या वाढत्या करापोटीच ठाणे आरटीओचे टार्गेट पूर्ण झाल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस