लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरबाड येथील धाडीत गावठी दारुसह एक लाखांचा ऐवज जप्त केला. तर भार्इंदर येथील धाडीत रविवारी गावठी दारुसह ५० हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आली आहे.कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्चभूमीवर देशी विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारु विक्री आणि निर्मितीला बंदी आहे. असे असूनही मुरबाडच्या उचले गावच्या परिसरातील जंगल टेकडी भागात गावठी दारुची निर्मिती होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस हवालदार महादेव खोमणे यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी उचले गावातील जंगल टेकडी भागातील ओहळाच्या जागेतील गावठी दारुच्या अड्डयावर धाड टाकली. या धाडीत गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे पत्र्याचे दोन मोठे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे प्रत्येकी १७५ लीटर नवसागर मिश्रित गुळ आणि मोहाची फुले असलेले सात प्लास्टीकचे ड्रम आणि ३५ लीटर गावठी दारु असा एक लाख ९७५ रुपयांचा मुद्देमाल याठिकाणी जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये योगेश गडगे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात महाराष्टÑ प्रोव्हीशन अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूसऱ्या घटनेत मोरवा भाट, भार्इंदर पश्चिम खाडीच्या किनारी मिठागरातून गावठी दारुची विक्रीसाठी वाहतूक करणा-या विक्रांत राऊत (२१, रिक्षा चालक, रा. मोरवा गाव, भार्इंदर) आणि सुमित सिंग (२८, रा. राईगाव, भार्इंदर) या दोघांना १२ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लीटरच्या ३२प्लास्टीकच्या पिशव्या त्यामध्ये ४८ हजारांची ४८० लीटर गावठी दारु जप्त केली आहे. त्यांच्याविरुद्ध भार्इंदर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथ रोग प्रतिबंधक कायदा तसेच दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे मुरबाड, भार्इंदरमध्ये धाडसत्र: दीड लाखांची गावठी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 8:16 PM
कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्चभूमीवर देशी विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारु विक्री आणि निर्मितीला बंदी आहे. असे असूनही मुरबाडच्या उचले गावच्या परिसरातील जंगल टेकडी भागात गावठी दारुची निर्मिती तर भार्इंदर भागातून विक्री सुरु होती. या दोन्ही ठिकाणी धाड टाकून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये दीड लाखांची गावठी दारु जप्त केली आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारु विक्री आणि निर्मितीला बंदीमुरबाडमधून एकाला तर भार्इंदरमधून दोघांना अटक