लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : थेट प्रक्षेपणाद्वारे पोलिसांना प्रशिक्षण देण्याची संकल्पना यशस्वी करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलिसांना फिक्की (फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स अॅण्ड कॉमर्स इंडस्ट्री) या संस्थेमार्फत ‘स्मार्ट पोलिसिंग’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तर, पुण्याच्या पोलीस उपअधीक्षक स्वप्ना गोरे यांनी महाराष्ट्रला मिळालेला स्पेशल ज्युरी अॅवार्ड नुकताच दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते स्वीकारला.नवी दिल्ली येथे २३ आॅगस्ट २०१९ रोजी होमलॅण्ड सिक्युरिटी यांच्या वार्षिक परिषदेमध्ये देशभरातील पोलिसांना विविध विषयांनुसार सन्मानित केले. यामध्ये स्मार्ट पोलिसिंगअंतर्गत महाराष्ट्र पोलिसांच्या ठाणे ग्रामीण पोलिसांनी बाजी मारली. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना थेट प्रसारणाद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याची संकल्पना कोकण विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी अमलात आणली. यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, मीरा रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, भार्इंदरचे उपविभागीय अधिकारी अविनाश भोसले आणि उपनिरीक्षक स्वाती जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोकण परिक्षेत्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मुख्यालयात प्रशिक्षणासाठी यावे लागत होते. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘ट्रेनिंग अॅण्ड लाइव्ह ब्रॉडकास्टिंग’ हे तंत्रज्ञान विकसित करून पाचही जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रक्षिक्षण लाइव्ह ब्रॉडकास्टिंग सुविधेंतर्गत विकसित केले. त्यामुळे थेट रत्नागिरी किंवा रायगड येथून ठाण्यात येणा-या पोलिसांचा वेळ आणि खर्चाची बचत झाली.ठाणे ग्रामीणच्या याच तंत्राची ‘प्रशिक्षण आणि क्षमता’ या वर्गात ‘फिक्की’ या संस्थेने निवड करून देशभरातील १९० प्रवेशिकांमधून त्यांना स्पेशल ज्युरी अॅवार्ड दिला. नवल बजाज यांच्या संकल्पनेतून साकारलेले प्रशिक्षणाचे हे तंत्रज्ञान केवळ अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज नाही, तर आधुनिकतम आणि नवीनतम माहितीसह पोलिसांना सतत अद्ययावत करते. हा प्रकल्प, तंत्रज्ञानात कौशल्य विकास आणि तपासणीच्या इतर बाबींशी संबंधित विभागतज्ज्ञांनी तयार केला आहे. या प्रशिक्षणासाठी पोलीस कर्मचा-यांशी ई-मेलद्वारे संपर्क साधला जातो. यामध्ये नियोजित तारीख आणि वेळेनुसार थेट प्रसारण प्रशिक्षण दिले जाते.
‘‘यापूर्वी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना दूरच्या ठिकाणी जावे-यावे लागायचे. त्यामुळे दररोजच्या ड्युटीसाठी मनुष्यबळाची कमतरता तसेच प्रशिक्षण केंद्रावर जागेची समस्या उद्भवत होती. आता नव्याने अवलंबलेल्या ई-लर्निंग उपक्रमामुळे वेबकास्टिंगद्वारे वेगवेगळ्या ठिकाणच्या मोठ्या संख्येतील पोलिसांना प्रशिक्षण देणेही शक्य झाले आहे. देशभरातील विविध कायद्यांची अंमलबजावणी करणाºया एजन्सींनीही ठाणे ग्रामीण पोलिसांनी दत्तक घेतलेल्या ‘स्मार्ट पोलिसिंग’ सोल्युशनची चातुर्य आणि दूरदर्शिता मान्य केली आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण