शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

‘आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना,’ शिंदे समर्थकांची जोरदार पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 3:40 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी मनस्थिती झाली होती.

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी मनस्थिती झाली होती. मात्र आता एक एक करुन ठाण्यातील शिवसैनिक एक होत असून त्यांनी शिंदे यांचाच झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे बॅनर, पोस्टर शहरभर लागण्यास सुरवात झाली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर देखील आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशयाचे बॅनर वायरल केल्याने आता ठाण्याची साथ शिंदेंनाच हेच आता यातून दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात शिंदे यांच्या बाजूनं आमदारांची फौज वाढत असल्याने आता ठाण्यातील शिवसैनिकांनी देखील शिंदे यांनाच साथ देण्याचा निर्धार केला आहे. मागील दोन दिवस ठाण्यातील शिवसैनिक देखील एक एक करुन एकमेकांचा कानोसा घेत होते, काहींच्या मनात शिंदे की ठाकरे अशी द्विधामनस्थिती देखील निर्माण झाली होती. परंतु अशांची मने वळविण्याचे काम शिंदे समर्थकांकडून आता यशस्वीपणो केले गेल्याचेच चित्र गुरुवारी ठाण्यात दिसत होते.

काहींनी या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतली आणि शिंदे यांनाच पाठींबा असल्याचे जाहीरपणो सांगितले. तर काही शिंदे समर्थकांनी अनेकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मन वळविण्याचे काम केल्याचेही बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील आता प्रत्येक भागात शिंदे समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. साहेब आम्ही तुमच्या सोबतच.. आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशायाचे फलक शहरभर लावले जात आहेत. त्या फलकांवर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे फोटो दिसत आहेत. मात्र कुठेही उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला नाही. महाविकास आघाडीबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी उघडपणो शिंदे यांना समर्थन जाहीर केले. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरवात झाल्याचे चिन्ह आहे.

दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु  केले असतांना त्यावर काही शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुम्ही शिवसेना सोडाल, पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही, अशा काही प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे.

कार्यक्रम रद्दगुरुवारी शिंदे यांच्या समथनार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर समर्थक शक्तीप्रदर्शन करणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही शिवसैनिकांर्पयत याची माहिती न पोहचल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे