- अजित मांडके ठाणे : ठाण्यातून बोरिवलीला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसचा ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने बस घेऊन जाताना, बसच्या पुढे असलेल्या कंटेनरला त्याने मागून जोरदार धडक दिल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे.
वाहक बसलेल्या बसचा दर्शनीभागाचे मोठया प्रमाणात झाले. यावेळी बसमध्ये ९ प्रवासी होते, त्यामधील बस वाहक अमर परब (३८) आणि प्रवासी महिला गीता कदम (४१) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्या ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्या दोघांच्या दोन्ही पायाला दुखापत झालेली आहे. तसेच इतर प्रवासी सुखरूप असल्याने ते घटनास्थळावरून आपापल्या घरी मार्गस्थ झाले आहेत.
एसटी बस चालक संदीप पाटील (३७) आणि जखमी वाहक अमर परब हे दोघे ठाण्यातून MH 14 BT 4489 या क्रमांकाची एसटी बस घेऊन बोरीवलीला निघाले होते. यावेळी बसमध्ये चार महिला आणि पाच पुरुष असे ९ प्रवासी बसलेले होते. बस पूर्व द्रुतगती महामार्गावर आल्याने चालक पाटील यांनी वेग वाढला असल्याने ज्युपिटर हॉस्पिटल समोर आल्यावर बसने पुढे असलेल्या कंटनेरला वाहक बसत असलेल्या साईटने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती. वाहकाच्या बाजूची साईटचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय बसचे वाहक परब आणि डोंबिवली कोपर,आयरे गाव येथील प्रवासी महिला कदम असे दोघे त्या अपघात जखमी झाले आहेत. त्या दोघांच्या दोन्ही पायाला दुखापत झालेली आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. सकाळी झालेल्या या अपघाताने त्या परिणाम वाहतुकीवर झाला होता. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली त्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.