शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

By अजित मांडके | Published: March 18, 2024 7:01 PM

ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडीतून गाड्या सुटणार

ठाणे : शिमग्याला हमखास चाकरमानी हे आपल्या गावी जातात. त्यामुळे नेहमीच मुंबई - ठाण्यातील चाकरमान्यांना सुखरूप या सणांना सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदा ही सज्ज झाले. यावेळी तब्बल १२६ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये आरक्षणाच्या १०६ तर ग्रुपच्या २० गाड्यांचा समावेश आहे. तर यंदा १२ गाड्या वाढण्यात आल्या. तसेच ठाणे-२ या एकाच आगारातून सर्वाधिक 39 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या २२ ते २६ मार्च दरम्यान गाड्यांचे नियोजन असून चाकरमान्यांनी गावी जाताना आपले तिकीट आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.         

येत्या २४ मार्चला होळी आणि २५ मार्चला धुळवड झालेली आहे. त्यामुळे कोकणात होळीला जाणाऱ्यांची लगबग लक्षात घेत एसटीच्या ठाणे विभागाने चांगली कंबर कसली असून येत्या २२ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले गेले आहे. तर २३,२४,२५ आणि २६ मार्च रोजी जास्त जादा गाड्या सोडण्यावर भर दिला गेला आहे. त्या आठवड्यात ठाणे -१ आगारातून २९, ठाणे-२ आगारातून ३९, कल्याण आगारातून २३ आणि विठ्ठल वाडी आगारातून ३१ अशा १२२ गाड्या सोडण्यात आला. या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. चाकरमान्यांनी होळी सणाला जाण्यासाठी खिडकी तसेच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा. 

या आगारातून सुटणार या गाड्याठाणे -१महाड, पाली, कावळा, पोलादपूर, चिपळूण,मंडणगड, दुर्गेवाडी-मंजूत्री, कासे माखजन, दापोलीठाणे-२शिरगाव,फौजी अंबावडे,चिपळूण,शिवथरघळ, बीरमणी, कोतवाल,दापोली, महाड, खापरपा, शिंदी,गुहागर, खेड, देवळी,भेदवाडी*कल्याणपोलादपूर, कोतवाल, दिवेआगार, फौजी अंबावडे, शिवथरघळ, खेड,चिपळूण, दापोली*विठ्ठल वाडीचिपळूण, तळीये,दापोली,ओंबळी, गुहागर,मुरुड,रत्नागिरी,काजूर्ली, कासे माखजन, गराटे वाडी, दापोली,साखरपा................ .. ठाणे विभागदिनांक            आरक्षण     ग्रुप २२/३/२०२४  - ३२      ०     ०८२३/३/२०२४  -  ४६    -     १०२४/३/२०२४   - १९      -     ००25/३/२०२४  - ०५     -      ००२६/३/२०२४   -  ०४        -    ०२एकूण  -  १२६  -  १०६     -  २०

टॅग्स :thaneठाणेHoliहोळी 2023