- सुरेश लोखंडेठाणे - ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात सहकुटुंब महामोर्चा आंदाेलन कर्मचारी ८ नाेव्हेंबर राेजी करणार आहे. या अभिनव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सचिवांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले हाेते. मात्र सुमारे दीडतास चर्चा हाेउनही ताेडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी सहकुटूंब महामाेर्चा आंदाेलन समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हाेणार असल्याचे सुताेवाच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते भास्कर गव्हाळे, जिल्हा अध्यक्ष प्राची चाचड यांनी लाेकमतला सांगितले.
जुनी पेन्शनचा विचार करण्यासाठी शासनाने समिती गठन केली. पण सहा महिन्यांहून अधिक काळ उलटूनही समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. यामुळे कर्मचारीवर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’ मिळवण्यासाठी सहकुटूंब कर्मचारी महामाेचार् काढून राज्य शासनाचे लक्ष वेधणार आहे. या मागणीसह इतर १७ मागण्यांवर साधी बैठकही न झाल्यानेही कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येउन या राज्यस्तरीय महामाेर्चा आंदाेलनात सहकुटूंब सहभागी हाेणार आहे. राज्य सरकारी-निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आदी संघटनेच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा महामाेर्चा आयाेजित केला आहे.