शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

Thane: रुग्ण आणि रुग्णसेवेबाबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या यंत्रणेला सक्त सूचना

By अजित मांडके | Published: August 15, 2023 9:51 PM

Thane: दाखल करण्यायोग्य एकही रुग्ण नाकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.  सर्वांशी सौजन्याने वागा, रुग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही हयगय होता कामा नये अशा सक्त सूचना  आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

- अजित मांडके ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी समन्वय साधून आरोग्य सेवा, रुग्ण सेवा हेच सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य ठेवले पाहिजे,  रुग्णालयात दैनंदिन विविध उपचारांसाठी रुग्ण्‍ येत असून सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढली असली तरी दाखल करण्यायोग्य एकही रुग्ण नाकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.  सर्वांशी सौजन्याने वागा, रुग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही हयगय होता कामा नये अशा सक्त सूचना  आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना दिल्या. कर्मचारी, नर्स, औषध पुरवठा, सुरक्षा यंत्रणा, यंत्रसामग्री या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही प्रशासकीय बदल करण्यात आले.

रुग्णालयात ठाण्यासह आजूबाजूच्या महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतील याबाबतची काळजी सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, शिफ्टनुसार बदलणारा कर्मचारी वर्ग यांनी वेळेवेर उपस्थित राहण्याच्या सूचनाही आयुक्त्‍ श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या.वॉर्डमधील नर्सेसची ज्युनिअर तसेच रेसीडन्स डॉक्टरांची उपस्थिती ऑन कॉल वैद्यकीय अधिकारी यांची कर्तव्य कालावधीतील संपूर्ण रुग्णालयातील उपस्थिती, बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ विशेष तज्ज्ञ यांची उपस्थिती, रुग्णकक्षातील रुग्णांचे व्यवस्थापन तसेच दिली जाणारी उपचार पध्दती यांबाबत स्वत: विभागप्रमुख जबाबदार राहतील अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा विभागप्रमुख स्वत: प्रत्येक रुग्ण्कक्षेमध्ये राऊंड घेतील व रुग्णाची परिस्थिती तपासून आवश्यकतेनुसार आवश्यक ती कार्यवाही करतील अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. या व्यतिरिक्त्‍ अधिष्ठाता यांनी स्वत: त्यांच्या स्वत:च्या विभागाव्यतिरिक्त्‍ दररोज किमान दोन विभागांच्या रुग्ण्कक्षामध्ये राऊंड घेणे बंधनकारक राहील अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. अधिष्ठाता यांनी हॉस्टेल, लॉण्ड्री, कॅन्टीन, भोजनगृह या ठिकाणी वेळोवळी भेट दिली जाईल याची दक्षता घ्यावी.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय हे सेवालाल नगर येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, परंतु याबाबत रुग्णांना पुरेशी माहिती नाही. जर आपल्याकडे बेड उपलब्ध नसल्यास रुग्णांना सिव्हिल किंवा मुंबईला इतर रुग्णालयात पाठवावे लागल्यास त्यांना आपल्या रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच रुग्णांना लागणारी औषधे ही रुग्णालयातच उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे. औषध भांडार विभागात औषधांचा साठा नियमित उपलब्ध असेल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या चाचण्या रुग्णालयात केल्या जातात त्या चाचण्या रुग्णालयातच होतील याबाबत दक्षता घेण्यात यावी. चाचण्या करण्यासाठी रुग्णांना इतरत्र पाठविण्यात येवू नये असेही त्यांनी नमूद केले. प्रशासकीय कामकाजात बदल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात देखील आयुक्तांनी बदल केले असून नवीन कार्यालयीन अधीक्षक व लिपिकांची नेमणूक करण्यात आली असून सदर अधिकाऱ्यांनाही कामकाजाबाबत सूचना करण्यात आल्या.

रुग्णालयात येणारा रुग्ण हा आजारांनी हतबल झालेला असतो, अशावेळी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांसोबत डॉक्टर्स, नर्स यांनी सौजन्याची वागणूक ठेवण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षकांनी देखील रुगणालयात येणाऱ्या रुग्णांशी नीट वागावे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच रुग्णालयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारे सद्यस्थितीतील रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने एकेक मजल्याचे काम हाती घेवून ते पूर्ण केले जाणार आहे. यामुळे दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त्‍ बेडची सोय केली जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका