शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

जगातील 400 विद्यार्थांमध्ये ठाण्याच्या दहा विद्यार्थांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:58 PM

एक दमदार पाऊल टाकत, ठाण्याच्या युरोस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

ठाणे : एक दमदार पाऊल टाकत, ठाण्याच्या युरोस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, EINE WELT - ONE WORLD (आईन वेल्ट - वन वर्ल्ड) या जर्मन अल्बमसाठी गाणे सादर करणारी आशियातील पहिली शाळा ठरण्याचा मान युरोस्कूलच्या मुलांनी मिळवला आहे. या दहा मुलांमध्ये 5 मुले तेरा वर्षाखालील आहेत आणि नऊ मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी जागतिक स्तरातून तब्बल 400 प्रवेशिका आल्या होत्या, Engagement global (एंगेजमेंट ग्लोबल)तर्फे German Federal President (जर्मन फेडरल प्रेसिडंट)च्या स्कूल डेव्हलपमेंट पॉलिसीसह संलग्नितपणे याचे आयोजन करण्यात आले होते. 

ठाण्याच्या युरोस्कूलच्या ``Ich bin Ich - I am me'' (ईश बिन ईश - आय एम मी) या गाण्याची निवड ``Dein Song Fuer Eine Welt” - Your song for One World  (दाइन साँग फ्यूर आईन वेल्ट" - युवर साँग फॉर वन वर्ल्ड) या जर्मन स्पर्धेसाठी झाली आहे, जागतिक शांतता आणि ऐक्य नांदावे हे या अल्बमच्या आयोजनाचे ध्येय आहे. या स्पर्धेत 10-25 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी जागतिक विकासासंबंधित थीमवर गाणे तयार करायचे होते - यात वांशिक भेदभाव, लैंगिक असमानता आणि धार्मिक भेदभाव यापैकी विषयांचा समावेश करायचा होता. याशिवाय गाण्याचे बोल स्वतंत्र नवीन आणि आवाजाच्या रचनेत गुंफलेले असावेत. यासाठी स्पर्धकांना आवाजातील सुधारणा करणे अतिशय गरजेचे होते. 

जागतिक स्तरातील निवडक विद्यार्थ्यांच्या बँडना बर्लिनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, येथे त्यांचे गाणे प्रोफेशनली रेकॉर्ड करण्यात येणार आले. हा अल्बम Germany’s Federal Minister for Economic Cooperation and Development (जर्मनीच्या फेडरल मिनिस्टर फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) यांच्यातर्फे 2018 साली नंतर प्रकाशित करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये 23 नवीन गाण्यांचा समावेश असेल. 

ठाण्याच्या युरोस्कूलच्या प्राचार्या रजनी पट्टाभिरामन् म्हणाल्या की, ``एकमेव आशियाई टीम म्हणून या स्पर्धेत सहभागी होणे आणि ती जिंकणे, तसेच स्पर्धेतील वयाने सर्वात लहान स्पर्धक म्हणून सहभाग असणे, या आमच्या युरोस्कूलच्या तत्त्वज्ञानामुळे घडलेल्या गोष्टी आहेत, योग्य शैक्षणिक अध्ययनाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून योग्य समतोल साधण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाचेच हे प्रतिबिंब आहे. आमच्या जर्मन भाषेच्या शिक्षिका प्रियांगु सावला यांचे मी आभार मानते, आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी राखून ठेवणे आणि या स्पर्धेसाठी त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देणे यासाठी मी आभार मानत आहे.''

या संधीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळाले आहे, विविध देशातील लोकांबरोबर सुसंवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली आहे. शाश्वत विकासाची ध्येये, यावरील शिबिरातून आमच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे, हे शिबीर सहभागी स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आले होते. हा संपूर्ण उपक्रम म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन दारे उघडणारा आणि नवीन संधी देणारा अनुभव ठरला आहे,'' असेही त्या म्हणाल्या. 

या टीममध्ये इयत्ता सहावीतील दुर्वा पंत (11) आणि वेदांती प्रवीण राऊत (11), इयत्ता सातवीतील खुशी परेश व्होरा (12) आणि तनिषा प्रमित सावला (12), इयत्ता आठवीतील प्रवलिका गुम्मा (12), तानिया बामनोडकर (13), आर्या महेश धाकटे (13) आणि आदित्य दिवेकर (13) तसेच इयत्ता नववीतील उर्वी ठाकूरदेसाई (14) आणि दिव्या जयराम (14) आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जर्मनच्या शिक्षिका श्रीमती प्रियांगु सावला व त्यांच्या ग्रूपला जर्मन न्यूजलेटरमधून ही संधी माहीत झाली. आमच्या शाळेने Innocence (इनोसन्स) हा विशेष बँड ग्रूप तयार केला आणि हे गाणे गायले आहे. 

विद्यार्थी म्हणतात बँडची प्रमुख गायिका उर्वी ठाकूर देसाई म्हणते,  हे नक्की खरं घडतंय ना याची मी मलाच चिमटा काढून खात्री करून घेत होते. अर्थात, सगळ्या मेहनतीचं चीज झालं. आमची शाळा आणि भारत देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करता आलं आणि जर्मनीत जाऊन गाण्याचं रेकॉर्डिंगही केलं, ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हा सगळाच प्रवास उत्साहवर्धक आणि समृद्ध करणारा होता. माझ्यासाठी हा अनुभव कायम असाच राहील.

पियानोवादक तनिषा सावला म्हणाली की,  बर्लिनमध्ये आम्हाला जे प्रेम मिळालं, जे महत्त्व आम्हाला मिळालं, त्याने तर आम्ही खरोखर स्टार असल्यासारखंच वाटत होतं. जिकडे जिकडे आम्ही जात होते, तिकडे लोकं आम्हाला भारतीय बँड म्हणून ओळखत होती. आम्ही केवळ आमचं राज्य नाही तर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे आशियातील स्पर्धक होतो. Ich Bin Ich (ईश बिन ईश) हे आमच्यासाठी केवळ गाणं नव्हतं. ती आमच्यासाठी अगदी आयुष्यभराची संधी होती.

बँडच्या सर्वात लहान मेंबर दुर्वा पंत आणि वेदांती राऊत यांनीही त्यांचे अनुभव सांगितले, ``शाश्वत विकासाची ध्येये या शिबिरामुळे आम्हाला खूप माहिती मिळाली. इतर देशांमधल्या इतक्या चांगल्या लोकांना भेटणं, तिथलं चविष्ट जेवण घेणं, त्यांच्या संस्कृतीविषयी इतक्या जवळून जाणून घेता येणं, एकमेकांचे आचार-विचार यांची देव-घेव करणं हा एक अप्रतिम अनुभव होता. या अनुभवाचा भाग होणं हे आमचं भाग्यच आहे.''

युरोस्कूलविषयी थोडेसेयुरोस्कूल ही भारतातील अग्रणी पूर्व प्राथमिक शाळांची शृंखला युरोकिड्स इंटरनॅशनल लिमिटेडशी संलग्न आहे. युरोस्कूल एलकेजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण करते, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि सुरत आदी ठिकाणी तिच्या सह 10 शैक्षणिक शाळा आहेत. सर्व शाळा एक तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसइ)ने किंवा इंडियन कौन्सिल ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसइ)ने प्रमाणित आहेत. शैक्षणिक आणि अभ्यासेत्तर उपक्रमांतून` संतुलित शिक्षण' या तत्त्वावर युरोस्कूल चालते. 21 व्या शतकासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणासाठी युरोस्कूल  `शिका... अभ्यासा.. स्वतःला शोधा' या बोधवाक्यावर उभारण्यात आल्या आहेत. `सुरक्षित शाळा' असे ग्लोबल ऑडिट फर्म ब्युरो व्हेरिएट्सचे प्रमाणपत्र मिळवणारी ही भातातील पहिली शृंखला शाळा आहे. तसंच युरोस्कूलला 2015 साली सर्वात जलद गतीने विकसित होणारी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून 6व्या ब्रँड अकॅडमीच्या अकॅडेमिक एज्युकेशन एक्सलंस स्कूल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.  अधिक जाणून घेण्यासाठी http://euroschoolindia.com/ येथे भेट द्या.