ठाणे : साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर शहापूर तालुक्यात पाºयाने चाळीशी गाठली.ठाणे जिल्ह्यातील उन्हाचा कडाका सकाळी ११ नंतरच जाणवू लागला. दुपारी चारपर्यंत हे तापमान कायम होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा रोड, भार्इंदर, मुरबाड या परिसरात दुपारी पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला. शहापूर तालुक्याने मात्र ही जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानवाढीची नोंद केली. तेथील पाºयाने उन्हाळ््याची चाहूल लागताक्षणीच चाळीशी गाठल्याने यंदाचा उन्हाळा किती तीव्र असेल याची चुणूक पाहायला मिळाली. गेल्यावर्षीही उन्हाळ््यात शहापूर, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांनी सर्वाधिक तापमानाची नोंद केली होती. काही दिवस तेथील पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान पोहोचला होता.गेल्या आठवड्यात वातावरणात झपाट्याने झालेल्या या बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, उष्णतेच्या विकारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी भरपूर पाणी प्या. खूप थकवा जाणवला, तर लिंबू सरबत, कोकम किंवा आवळा सरबत, शहाळ््याचे पाणी प्या. कोल्ंिड्रकपेक्षा नैसर्गिक फळांपासून बनवलेली सरबते प्या असे सल्ले दिले.
ठाणे : होळीपूर्वीच उन्हाळा ! आरोग्य सांभाळा : तापमान ४० अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:54 AM