- जितेंद्र कालेकर
ठाणे - गुजरातमधून आलेल्या गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी करणाऱ्या मंजितकुमार गांगो राय (२७, रा.चुनाभट्टी, काशिमिरा, ठाणे ) याला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून १८ लाखांच्या गुटखा तसेच टेम्पो असा २४ लाख ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुजरातमधून येणारा गुटखा तसेच सुगंधित पानमसाल्याची एका टेम्पोतून कळवा भागातून तस्करी केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे ११ आॅक्टोबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया ोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक ष्घुगे यांच्या पकाने कळव्यातील खारेगाव टोलनाका या भागात मंजितकुमार राय या टेम्पो चालकाला प्रीमीयम राज निवास सुंगधीत पानमसाला व प्रीमियम झेड एल जाफरानी जर्दा हा महाराष्टÑात बंदी असलेला १८ लाखांचा गुटखा विक्रीसाठी वाहतूक करतांना टेम्पोसह पकडण्यात आला. याप्रकरणी राय याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८, १८८ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये टेम्पो चालक मंजितकुमा याला अटक करण्यात आली आहे. त्याला १३ आॅक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. हा गुटखा कोणी आणला होता? कोणाकडे दिला जाणार होता? यात कोणत्या टोळीचा सहभाग आहे किंवा कसे? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.