- सुरेश लोखंडे ठाणे - येथील जिल्हा परिषदेच्या कडील सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमधीाल वर्ग-३ व ४ संवर्गातील आदर्श कर्मचारी पुरस्कार योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याव्दारे २०२३-२०२४ मधील आदर्श कर्मचारी निश्चित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने तब्बल १६ कर्मचाऱ्यांना आदेर्श कर्मचारी पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा पातळीवर आठ कर्मचाऱ्यांसह पंचायत समितीच्या पातळीवर आठ कर्मचाऱ्यांना या पुरस्काराचा यंदा लाभ झाला आहे. तसे आदेश जारी झाले असून येथील जिल्हा नियाेजन भवनमधील कार्यक्रमात त्यांना सनमानीत करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून शासनाच्या आदेशास अनुसरून आठ सदस्सीय समिती गठीत करून त्यांच्या समितीने प्राप्त अर्जानुसार संबंधित कर्मर्ऱ्यांचे गोपनीय अभिलेख विचारात घेण्यात आले. यानंतर निकषानुसार व गुणांकणानुसार निवडीसाठी शिफारसी केलेल्या आहेत. त्यानुसार संवर्गनिहाय या१६ कर्मचाऱ्यांची २०२३-२०२४ या अर्थिक वर्षासाठी आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून तसे घोषित करण्यात आले. महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यक्रमाती या कर्मचाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमात आंगणवाडी सेविका, मदतनीस आदींना जागतीक महिला दिनाचे औचित्या साधून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी आदर्श कर्मचारी पुरसकारप्राप्त झालेल्यांमध्ये जिल्हा पातळीवरील पाणी पुरवठ्याचे विस्तार अधिकाारी मनोहर शेजवळ, महिला बालकल्याण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी विकास वेखंडे, आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक नितीन घोडके, शहापूरचे वरिष्ठ सहाय्यक विकास मेतकर, जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक प्रशांत धनगर, लघूपाट बंधारे विभागाचे श्रावण भोये, आराेग्याचे अनिल शिंदे, शिल्पा नाईक, अर्थ विभागाचे यशवंत साळुंखे, शहापूरचे अजय भोंडीवले, सुरेखा पाटील. अरुण विशे, कल्याणचे किरण अधिकारी, शहापूरमधील नरेंद्र विदे, राहुल कांबळे, अंबरनाथमधील अरुणा माळवदे,