- सुरेश लोखंडेठाणे - गांवखेड्यांमध्ये संगणकीकृत दाखले म्हणजे जी २ सी, बी २ सी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित केले जात आहे. यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा निर्गमित करून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदंल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे राज्यस्तरीय आढावा ऑनलाईन बैठकीत ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी अभिनंदन केले.
ठाणे जिल्हा परिषदने आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना ५९ हजार ५१२ इतके स्वयंघोषणापत्र निर्गमित करण्यात आले आहे. बिटूसी सेवा अर्थात व्यावसायिक सेवा अंतर्गत विविध प्रकारचे रिचार्जेस करणे, ऑनलाईन पेमेंट करणे, टिकिट बुकींग करणे, पीक विमा भरणे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करणे, आयुष्यामान भारत कार्ड नोंदणी करणे, बॅंक व्यवहार करणे, विविध योजना करीता लाभार्थ्यांची नोंदणी करणे व इतरही अनेक प्रकारच्या सेवांचा यात समावेश होतो. या सेवा पुरविण्यात ठाणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महाईग्राम पोर्टल, ॲप व्दारे कर आकारणी करणे व दाखल्याची मागणी करणे बाबत प्रेरित करण्यात येत आहे.