शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

Thane: ठाणेकरांना अवघ्या १० रुपयात करता येणार वातानुकुलीत बसमधून प्रवास

By अजित मांडके | Published: February 17, 2023 4:19 PM

Thane News: ठाणेकरांच्या सेवेत येत्या जुलै अखेर पर्यंत १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवास भाडे कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

- अजित मांडके 

ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत येत्या जुलै अखेर पर्यंत १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. परंतु इतर प्राधिकरणांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी परिवहनने आता इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवास भाडे कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाणेकर प्रवाशांना अवघ्या १० रुपयात एसीचा गारेगार प्रवास करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्यासाठी एसी बसचे भाडे हे २० रुपये होते. परंतु आता त्यासाठी १० रुपये मोजावे लागणार आहे. तर बोरीवली पर्यंत जाणाºया प्रवाशांना यापूर्वी ८५ रुपये मोजावे लागत होते. आता त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

परिवहनच्या ताफ्यात येत्या काळात १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. पैकी ४५ स्टॅण्डर्ड बस व २६ मिडी बस अशा एकूण ७१ बस वातानुकुलीत तसेच १० स्टॅण्डर्ड व ४२ मिडी बस अशा एकूण ५२ साध्या बस उपलब्ध होणार आहेत. यातील एकूण वातानुकुलीत २६ मिडी बस शहरातंर्गत व उर्वरीत ४५ स्टॅण्डर्ड बसपैकी काही बस ठाणे शहराबाहेरील दिर्घ पल्याच्या मार्गावर घाटकोपर, बोरीवली, नवीमुंबई, पनवेल आदी मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे.

परंतु ठाणे शहरात बेस्ट मार्फत चालविण्यात येत आहेत. त्यांचे तिकीट दर मात्र परिवहन पेक्षा कमी आहेत. त्यात बेस्ट व नवीमुंबई महापालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या वातानुकुलीत बसचे तिकीट दर ही कमी केलेले आहेत. त्या उपक्रमांशी स्पर्धा करावयाची झाल्यास अधिकाधिक प्रवासी उत्पन्न प्राप्त करुन घ्यायचे झाल्यास ठाणे परिवहनचे तिकीट दर देखील कमी करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार इलेक्ट्रीक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्या बसचे तिकीट दर हे कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्याचे भाडे (इलेक्ट्रीक वातानुकुलीत बसचे) १० रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वी यासाठी २० रुपये मोजावे लागत होते. तर बोरीवली पर्यंतचे भाडे ८५ ऐवजी ५० रुपये असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास लवकरच गारेगार होणार आहे.

व्होल्वो बसचे तिकीट दरही होणार कमीपरिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल झाल्यानंतर या बसचे तिकीट दर कमी असणार आहे. परंतु परिवहनच्या ताफ्यात सध्या असलेल्या ३० व्होल्वो अर्थात एसी बसचे भाडे हे अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते. ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक बस दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्होल्वो बसचे प्रवासी भाडे देखील इलेक्ट्रीक बस प्रमाणे समान करता येणार आहे.

किलोमीटर - सध्याचे भाडे - प्रस्तावित भाडे० ते २ किमी - २० रुपये - १० रुपये२ ते ४ - २५ - १५४ ते ६ - ३० - १५८ ते १० - ४० - २०१० ते १२ - ५० - २०२८ ते ३० - ८५ - ५०३८ ते ४० - १०५ - ६५

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे