ठाणे : पुढील महिन्यापासून ठाणो महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सुचना राज्य निवडणुक आयोगाने ठाणे महापालिकेला दिलेल्या पत्रत केल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात महापालिका क्षेत्नातील प्रभागांच्या सीमा २ मार्च नंतर निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतरच ख:या अर्थाने महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. एकूणच एप्रिल अखेर पर्यंत महापालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता यातून दिसत आहे. त्यातही राज्य निवडणुक आयोगाने सादर केलेल्या पत्रत प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा वॉर्ड असणार असून येथून पालिकेवर चार नगरसेवक निवडून जाणार आहेत.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ठाणे महापालिकेने यापूर्वीच प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभागांची संख्या, एकूण लोकसंख्या तसेच सदस्यसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सोडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गातील आकडेवारी ही संबंधित मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार असून त्यांच्या शिफारशी या राज्य या निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या शिफारशी येण्यास विलंब लागणार असल्याने तोपर्यंत ठाणे पालिका क्षेत्रातील प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासंदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेला दिले आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून यासंदर्भातील विवरण पत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या - १८,४१,४८८अनुसूचित जाती लोकसंख्या -१२६००३अनुसूचित जमाती लोकसंख्या -४२६९८एकूण प्रभागांची संख्या- ४७
निवडून जाणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या -१४२अनुसूचित जाती - १०अनुसूचित जमाती -३सर्वसाधारण -१२९
किती प्रभाग वाढले - १४किती सदस्यसंख्या वाढली- १२
महिलांसाठी आरक्षित जागा - ७१अनुसूचित जाती-५अनुसूचित जमाती-२सर्वसाधारण- ६४ प्रभाग क्रमांक ४४ सर्वाधिक मोठा प्रभाग, ४ सदस्य निवडून जाणारठाणे महापालिकेची निवडणूक ही तीन सदस्यीय पद्धतीने होणार असली तरी एकूण ४७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा प्रभाग असून या प्रभागाची लोकसंख्या तब्बल ५७ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या ठिकाणी तीन सदस्यांच्या ऐवजी चार सदस्य निवडून जाणार आहेत. इतर प्रभागांमधील लोकसंख्या ही ३५ हजारांपासून ४६ हजारांच्या घरात आहे. मात्र प्रभाग क्रमांक ४४ हा जास्त लोकसंख्येचा प्रभाग असल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.