शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

By admin | Published: November 14, 2015 11:54 PM

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

ठाणे : देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सहा महिन्यांपूर्वी शोध घेतला आहे. त्या ठिकाणांचे तीन गटांत वर्गीकरण करून त्यानुसार जवळपास १२५ ते १५० ठिकाणे निश्चित केली आहेत. या सर्वेक्षणात कल्याण परिमंडळात सर्वाधिक ठिकाणे असल्याचे समोर आले असून त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. शनिवारी फ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी या सर्व ठिकाणांसह शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करून पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये विशेष गर्दीची ठिकाणे असलेले रेल्वे, बस स्थानके , सिनेमागृह आणि मॉल या ठिकाणांचा समावेश आहे. तर, हॉटेल आणि लॉज आदी ठिकाणांची पोलिसांकडून तपासणीबरोबर शहरातील मुख्य ठिकाणांवर नाकाबंदीही सुरू केल्याचेही सूत्रे म्हणाली.मुंबई पोलीस दलापाठोपाठ ठाणे शहर पोलीस दलाकडे पाहिले जाते. शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर असे व्यापलेले आहे. या परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्याचबरोबर मुंब्रा, भिवंडी ही ठिकाणे संवेदनशील म्हणून जगजाहीर आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली ही नेहमी गजबजलेली रेल्वे स्थानके म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरडीएक्स मुंब्रा खाडीत सापडले होते. तसेच ठाण्यातील कळवा खाडी, अन्य आयुक्तालयांतील काही धार्मिक स्थळेही महत्त्वाची मानली जात असल्याने शहर पोलिसांनी संवेदनशील स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रत्येक परिमंडळनिहाय अतिसंवेदनशील, संवेदनशील अणि त्यापेक्षा कमी संवेदनशील अशी स्थळे शोधण्यात आली आहेत. आयुक्तालयात अतिसंवेदनशीलपेक्षा संवेदनशील स्थळे अधिक असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी) भार्इंदरमध्ये पोलिसांच्या गस्तीत वाढफ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अ‍ॅलर्टचा संदेश दिला असून गतवेळच्या काही घटनांमुळे मीरा-भार्इंदरमधील गस्तीतही वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात यापूर्वी रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट मीरा रोड लोहमार्गावर झाला आहे. तसेच काही अतिरेक्यांनादेखील येथून ताब्यात घेतल्याची तसेच एका तडीपार गँगस्टरलाही येथूनच अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर महासंचालकांनी दिलेल्या हाय अलर्टच्या आदेशानुसार शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.