शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्यातील ३२२५ शेतकऱ्यांना प्रथम २८५८१३९०२ रूपये भरण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:57 PM

दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे,

ठळक मुद्देप्रथम सुमारे २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरणे अपेक्षितनुकतीच ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ५५५ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ कोटी ४० लाख ८५ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरची कर्जाची रक्कम प्रथम शेतकऱ्यांना  भरणे सक्तीचे आहे. यानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) थकबाकीदार असलेल्या तीन हजार २२५ शेतकऱ्यांना प्रथम सुमारे २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्यांना संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ देणे शक्य होणार आहे.नुकतीच ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ५५५ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ कोटी ४० लाख ८५ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ वर्ग करण्यात आला आहे. या प्रमाणेच कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे, तरच कर्जमाफीचा लाभ त्यांना त्वरीत देणे शक्य असल्याचे मत टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भगिरथ भोईर यांनी सांगितले.या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड लाख रूपयांवरील थकबाकीची रक्कम भरल्यानंतर टीडीसीसी बँकेत देखील शासनाकडून त्वरीत ४८ कोटी ३७ लाखां रूपये जमा होणार आहे. यामुळे बँकेच्या गंगाजळीत मोठ्याप्रमाणात भर पडले. यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी देखील संबंधीत शेतकऱ्यांशी संपर्क साधून आहेत. दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यांपैकी सात हजार ४९८ थकबाकीदार शेतकऱ्यांना ३४ कोटी ४९ लाख ३१ हजार२८ रु पये तर सात हजार २३७ खातेदारांना ११ कोटी २९ लाख६९ हजार २०४ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ८२० खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात ४९ कोटी ६१ लाखा ८५ हजार ४२९ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यातील नऊ हजार १५ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ९२ लाख एक हजार ९२६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८०५ खातेदारांना नऊ कोटी ६९ लाख ८३ हजार ५०३ रूपये प्रोत्साहनपर रक्कम जमाझाली आहे. योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार