- प्रज्ञा म्हात्रेठाणे, महाराष्ट्र येथील नमन अरुणा विशाल पाटील (जन्म १०, ऑक्टोबर २०२१) याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले. २५ जुलै, २०२३ रोजी पुष्टी केल्यानुसार इंग्रजी वर्णमाला आणि १ ते १० पर्यंतच्या संख्या लक्षात ठेवण्यासाठी तसेच १२ प्राणी, ३ पक्षी, १० रंग, १० आकार, १० वाहने आणि १४ विविध चित्रे ओळखण्यासाठी त्यांना हे कौतुक मिळाले आहे.
त्याचे पालक, कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, त्याच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे नमनने वयाच्या ८ महिन्यांपासूनच आपली प्रतिभा विकसित करण्यास सुरुवात केली होती, जसजसे दिवस सरत होते तसतसे तो त्याच्या सभोवतालच्या जवळजवळ सर्व गोष्टी ओळखू लागला आणि तो स्पष्टपणे त्यांना लक्षात ठेवून ते आठवू लागला, त्याची बुद्धिमत्ता स्पष्टपणे देवाची देणगी आहे. ही प्रशंसा म्हणजे तल्लखपणा आणि प्रयत्नांचा सन्मान आहे. त्याचे पालक पुढे असंही म्हणतात की त्याला आपल्या देशाकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटतो आहे, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि या कौतुकाचा त्याच्या येणाऱ्या यशाला नक्कीच हातभार लागेल.