जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून बुडणा-या सात ते दहा कोटींच्या उत्पन्नाचा ‘क्लेम’ राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथे बायपासचे काम महिनाभर लांबणीवर गेले आहे. वाहतुकीचा हा ताण ठाणे शहर आणि ठाणे ते मुंबई तसेच मुंबई ते ठाणे जाणा-या वाहतुकीवर आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाहतूककोंडीचे चित्र होते. यातून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी एमएसआरडीसीचे मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ऐरोलीसह मुलुंड चेकनाका आणि कोपरी आनंदनगर अशा तीन्ही टोल नाक्यावरुन टोल वसूलीतून लहान वाहनांना मुक्त केले आहे. ही टोल माफी २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे शेकडो वाहन चालकांना किमान महिनाभर तरी टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. तसेच वाहतूककोंडीतील वेळही वाचणार असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी या राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. मंगळवारी मध्यरात्रीपासून अमलात आलेल्या निर्णयामुळे केवळ मोठ्या वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. पण ज्यांना अजूनही याची पूर्ण माहिती नाही. ते मंगळवारी टोल भरण्यासाठी टोलच्या केबिनजवळ काही सेकंद गाडी उभी करीत होते. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.............................एकाच मिनिटांमध्ये गेली १६० वाहने सुसाट
ठाणे- मुंबईच्या वाहतूककोंडीतील टोलमुक्ती ठरणार दहा कोटींची
By जितेंद्र कालेकर | Published: August 21, 2018 11:30 PM
जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून ...
ठळक मुद्दे गणेशभक्तांमध्येही आनंदवाहन चालकांनी केले स्वागत एमईपी करणार क्लेम