ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रि येत समावून न घेतल्याने काँग्रेस पक्षातून खदखद व्यक्त होत आहे. तीच नाराजी आता ठाण्यातही उघडपणे समोर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन ‘आम्हालाही बोलविणे करा’, अशी मागणी करून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, काँग्रेसने आता शिवसेनेसह राष्ट्रवादीवर निशाणा साधून आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो, असा सवाल केला आहे. कोविड रु ग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, महापालिकेत काही शहराच्या दृष्टीकोनातून बैठकी होतात, त्यावेळीही आम्हाला डावलण्यात येते, असा आरोपही काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे.राज्याप्रमाणेच ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचाच घटक असल्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने काँग्रेसलाही विचारात घेणे आवश्यक आहे. आम्हालादेखील शहराची आणि येथील नागरिकांची काळजी आहे. परंतुख वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का केला जातोय? असा सवाल त्यांनी केला आहे.राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.
ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी, काँग्रेसने शिवसेनेसह राष्ट्रवादीला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 12:22 AM