ठाणे: कारला फॅन्सी क्रमांक लावल्याचा जाब विचारला म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार संजय पवार (३७) यांना आरेरावी करीत मारहाण करणा-या सुनिल गोरे (३३) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजय पवार आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक रुपवते हे दोघेजण १३ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तीन हात नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्याचवेळी नाशिक बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणा-या फॅन्सी क्रमांकाच्या एका कारला पवार यांनी थांबण्याचा इशारा केला. त्याला बाजूला घेत त्याच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्याचीही त्यांनी मागणी केली. याचाच राग आल्याने कार चालक सुनिल गोरे याने पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळी करु नका, असे गोरे यांनी सुनावल्यानंतरही त्याने त्यांच्या पोटावर, पाठीवर जबर मारहाण केली. त्यांच्या पोटावर लाथेने मारहाण करुन त्यांची वर्दीही खराब केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पवार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री गोरेला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात वाहतूक पोलिसाला आरेरावी करीत मारहाण करणाऱ्या कार चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 8:11 PM
क्षुल्लक कारणावरुन नौपाडा वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला मारहाण करणा-या सुनिल गोरे याला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी १३ मार्च रोजी अटक केली आहे.
ठळक मुद्दे फॅन्सी क्रमांक लावल्याने थांबविल्याचा रागशिवीगाळ केल्याचा जाब विचारलानौपाडा पोलिसांनी केली कारवाई