लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करुन वाहन चालविणाºया ४१६ वाहन चालक तसेच २०७ सहप्रवाशी अशा ६२३ जणांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ३१ डिसेंबर रोजी एकाच दिवसात कारवाई केली. अवघ्या आठवडाभरात ९२६ मद्यपी चालक तसेच ४५१ सहप्रवाशी अशा एक हजार ३७७ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.थर्टी फर्स्ट तसेच नववर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध तसेच त्यांच्याबरोबर प्रवास करणाºया मित्र मंडळींविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याामुळे २५ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान वाहतूक शाखेच्या १८ युनिट मार्फत सुमारे ५४ पथकांनी ही कारवाई केली.गुरुवारी रात्री ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ९२६ मद्य प्राशन करणाºया वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १८५ नुसार तसेच सहप्रवाशांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली.* नारपोलीमध्ये सर्वाधिक कारवाईवाहतूक शाखेच्या १८ युनिटपैकी नारपोलीमध्ये ३१ डिसेंबर रोजी सर्वाधिक ६७ मद्यपी वाहनचालक आणि ४० सहप्रवासी आढळले. त्या खालोखाल कोनगावमध्ये ४४ चालक तर ३७ सह प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.* ३६१ दुचाकीस्वार जाळयातवाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्याा सापळयामध्ये सर्वाधिक ३६१ दुचाकीस्वार अडकले. त्यांच्यासोबत १७२ सह प्रवाशांवर कारवाई झाली. तर २९ रिक्षा चालक आणि पाच प्रवाशी तसेच २६ मोटारकार चालक आणि ३० सह प्रवाशांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ठाणे वाहतूक पोलिसांनी उतरवली ४१८ तळीरामांची झिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 11:04 PM
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या ४१६ वाहन चालक तसेच २०७ सहप्रवाशी अशा ६२३ जणांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ३१ डिसेंबर रोजी एकाच दिवसात कारवाई केली. वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १८५ नुसार तसेच सहप्रवाशांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्दे २०७ सह प्रवाशांवरही कारवाईचा बडगा एका आठवडयात ९२६ मद्यपी जाळयात