ठाणे - ठाणे परिवहन सेवेच 2019-20 चा अर्थसंकल्प गुरुवारी सादर जाले आहे. यंदा ठाणोकर प्रवाशांना सुखाच्या प्रवासाची हमी परिवहन सेवेकडून दिली जाणार आहे. परंतु, भाडे वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास महागणार आहे. 20 टक्के भाडेवाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.
जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा महापालिकेकडे 298.41 कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. तर जीसीसीच्या माध्यमातून ठाणेकरांना अतिरिक्त 150 बसेस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परिवहनमार्फत मागील वर्षी 381 कोटी 26 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र, यंदा त्यात वाढ होऊन हा अर्थसंकल्प 476.12 कोटींचे घरात पोहोचला आहे. मात्र, या अर्थसंकल्पात नाविन कोणतीही योजना नाही. जुन्याच योजना पुन्हा घेतल्या गेल्या आहेत. यामधे महिलांसाठी 50 तेजस्विनी बेसेस, 100 इलेक्ट्रिक बस, दिव्यांगांना सवलत, जेष्ठ नागरिकांना सवलत, ई टिकिट या काही जुन्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे.