- अजित मांडकेठाणे - ठाणे परिवहनसेवेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प १२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा पालिकेकडे १५० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. जीसीसीच्या माध्यमातून ठाणेकरांना अतिरिक्त १५० बसेस उपलब्ध होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परिवहनमार्फत मागील वर्षी ३८१ कोटी २६ लाख रु पयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा हा अर्थसंकल्प ४५० कोटींच्या घरात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही महिन्यांपासून परिवहनसेवेला जीसीसीचा आधार मिळाल्याने सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. परिवहनच्या बसेसने अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. परिवहनचे उत्पन्न हे २२ लाखांवरून ३० लाखांच्या घरात गेले आहे. परंतु, परिवहनच्या स्वत:च्या ताफ्यात असलेल्या बसेस फारशा रस्त्यावर उतरत नसल्याने टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे परिवहनच्या १५० बसेस आता जीसीसी तत्त्वावर रस्त्यावर उतरणार आहेत. या बसेसच्या दुरुस्तीसाठी ८.५० कोटींचा निधी खर्च होणार असून त्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. येत्या काळात ठाणेकरांना परिवहनच्या ताफ्यातील १२६, जीसीसीच्या नव्या २०० बसेस आणि आता दुरुस्त होऊन जीसीसीवर धावणाऱ्या १५० बसेस अशा तब्बल ४७६ च्या आसपास बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना चांगली सेवा मिळेल, असा दावा अंदाजपत्रकातून करण्यात आला आहे.परिवहनची वाटचाल खाजगीकरणाकडेमागील वर्षीच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या ५० तेजस्विनी बसेस या मार्चअखेर सेवेत दाखल होणार असल्याने त्याचाही अंतर्भाव यावर्षी ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.याशिवाय, १०० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्या, तरी या बसेसवर जाहिराती करण्यात येणार आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्याचा अंतर्भाव केवळ परिवहनच्या उत्पन्नात करण्यात येणार आहे.परिवहन जीसीसीसाठी पालिकेकडे १५० कोटींचे अनुदान मागणार आहे. मंगळवारी सादर होणाºया अंदाजपत्रकात परिवहनची खाजगीकरणाकडे वाटचाल दिसत असून प्रवाशांवर यंदा तिकीटवाढीचा बोजा पडणार नाही.
ठाणे परिवहन : ठाणेकर प्रवाशांना लवकरच मिळणार १५० नव्या बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:28 AM