ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोन मोटारसायकलस्वारांनी पलायन केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नौपाडयातील हनुमानमंदिराच्या समोरील सेवा रस्त्यावरुन ही ६० वर्षीय विवाहिता १ आॅगस्ट रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी मोटारसायकलने आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने तिच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची ३० हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी या महिलेने २ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक मनिष पोटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.