शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

आभासी चलनप्रकरणी ठाणे-विक्रोळीत धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:51 AM

आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावरील तसेच विक्रोळीतील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या कार्यालयात धाडसत्र राबविले.

ठाणे : आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावरील तसेच विक्रोळीतील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या कार्यालयात धाडसत्र राबविले. या दोन्ही कार्यालयांमधून काही महत्त्वाचे दस्ताऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुंतवणुकीचे अमिष दाखवून हजारो गुंतवणकदारांची फसवणूक केली असून हा आकडा शेकडो कोटींमध्ये वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. आतापर्यंत केवळ दोघेच तक्रारदार पुढे आले असल्यामुळे फसवणूक झालेल्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.याप्रकरणात तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ने अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या पथकांनी नवी मुंबई परिसरात बुधवारी मुख्य सूत्रधार अमित लखनपाल तसेच त्याचे साथीदार सचिन शेलार, विक्रम भंगेरा आणि कोमल शिरसाठ आदींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण यांच्यापैकी कोणीही या पथकाच्या हाती लागले नाही.आभासी चलनामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे सांगून दिल्लीतील प्रविण अग्रवाल आणि रोहित जैर यांच्याकडून अमित लखनपाल याच्या टोळीने ‘एमटीसी’ या आभासी चलनामध्ये एक कोटी ७६ लाख २६ हजारांची गुंतवणूक केली. त्यांना जादा परतावा मिळाला नाही. यात अडीच हजार लोकांची किमान ५०० कोटींपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी सध्या याप्रकरणात केवळ एक तक्रार दाखल आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा