ठाणे :
बंधाºयाच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्के म्हणजे ५० हजारांची लाच स्वीकारणाºया ठाणे जिल्हा परिषदेचे जल संधारण अधिकारी राजेंद्र पाटील (५७) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांच्या ग्रामपंचायतीसाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर होऊन त्यास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्याकडे जल संधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांनी या बंधाºयाचे बांधकाम सुरु करण्याबाबतची वर्क आॅर्डर (कार्यादेश) देण्यासाठी मंजूर निधीच्या एक टक्के अर्थात पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने २४ मार्च रोजी तक्रारदार यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी या तक्रारदाराकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये उघड झाले. त्याच अनुषंगाने २४ मार्च रोजी दुपारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच लावलेल्या सापळयात लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारतांना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीचे ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक सुनिल लोखंडे आणि अपर अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.