ठाणे : जिल्ह्यात गेल्या 24 तासाच्या कालावधीत अवघा 121 मिमी पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहर परिसरात 38 मिमी पाऊस पडला आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून ठाणे खाडीला भरती येणार आहे. या दरम्यान 4 मीटरपर्यंत लाटा खाडी किनारी उसळणार आहेत. त्यामुळे खाडी किनारी न जाण्याचे आवाहन आणि संपर्कात राहण्याचे मार्गदर्शन ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने नागरिकांना केले आहे.
दडी मारुन बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले. ठिकठिकाणी तुरळक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या. यादरम्यान ठाणे शहर परिसरात एक आगीच्या किरकोळ घटनेसह झाडाच्या फांद्या तुटल्याची घटना बाळकूम परिसरात घडली तर देविदयाल नगर येथे एक झाड धोकादायक स्थितीत असल्याचे टीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
खाडी किनारी उसळणाऱ्या या लाटा शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत किनार्यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आणखी बातम्या...
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान