- सुरेश लोखंडेठाणे - जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार मतदान करणार आाहेत. यात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीमुळे त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार तिन्ही मतदारसंघांतील सुमारे ४० मतदार परदेशात वास्तव्यास आहेत. त्यांना पोस्टल बॅलेटपेपरच्या माध्यमातून मतदान करता येईल. यातील सर्वाधिक मतदार ओवळा-माजिवडा विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील १३ मतदारांचा समावेश आहे.या अनिवासी भारतीय ४० मतदारांमध्ये ३२ पुरुष मतदार असून आठ महिला मतदारांचा समावेश आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ३६ अनिवासी भारतीय मतदार ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत आहेत. तर उर्वरित चार मतदार भिवंडी लोकसभेच्या कल्याण पश्चिम विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दोन आणि मुरबाड विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दोन अनिवासी भारतीय मतदार आहेत. कल्याण लोकसभेच्या कार्यक्षेत्रातील सहा विधानसभांमध्ये एकही अनिवासी भारतीय मतदार नाही.विशेष म्हणजे उल्हासनगर शहर निर्वासितांचे शहर म्हणून ओळखले जाते. या उल्हासनगर मतदारसंघात सुमारे दोन लाख २१ हजार ८५० मतदार आहेत. त्यात ३१ तृतीयपंथी मतदार आहेत.पण सर्वाधिक निर्वासित असलेल्या या शहरात एक अनिवासी भारतीय मतदारांची नोंद नसल्याचे आढळून आले. येथील बहुतांशी मतदारांचे नातेवाईक परदेशांत वास्तव्यास असल्याचे दिसून येते. पण त्यातील एकाने भारतीय नागरिकत्व न ठेवता तेथील नागरिकत्व स्वीकारले असल्याचे यावरून उघड होत आहे.सर्वाधिक अनिवासी ठाण्यातअनिवासी भारतीय मतदारांपैकी सर्वाधिक मतदार ठाणे लोकसभेच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आहेत. यात ११ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. याखालोखाल ऐरोली विधानसभेत आठ मतदार असून त्यात सहा पुुरुष व एक महिला अनिवासी भारतीय मतदार आहे. ठाणे आणि मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी पाच मतदार असून त्यातील प्रत्येकामध्ये एक महिला मतदाराचा समावेश आहे. बेलापूरला दोन पुरुष व दोन महिला मतदार असून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केवळ एक पुरुष मतदार अनिवासी भारतीय आहे.
ठाणे जिल्ह्यातील ४० मतदार परदेशातून करणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:47 AM