सुरेश लाेखंडे
ठाणे : मुंबई राज्याचे मुख्यमंत्री माेरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घ्ाटन केलेल्या जिल्हा परिषदेच्या वर्तक सभागृहाच्या इमारतीसह प्रशासकीय इमारत आणि अलिकडेच काही वर्ष्ांपूवी बांधलेल्या पदाधिकार्यांचे निवासस्थान आदी तिन्ही इमारती लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यातील या कार्यालयांचे स्थालांतर करण्याच्या हालचालींही जाेर धरला आहे. यासाठी २० हजार स्केअर फूटाच्या इमारतीचा शाेध सुरू आहे.
ठाणे परिसर व जिल्ह्याचे कामकाज पाहण्यासाठी तत्काली म्हणजे १९५४ च्या दशकाच्या आधीपासून जिल्हा परिषदेचे अस्थित्व आहे.आताची ठाणे जिल्हा परिषद ही शासकीय संस्था तत्काली ‘ठाणे जिल्हा लाेकल बाेर्ड’ म्हणून कार्यरत हाेती. या प्राचीन काळी बांधलेल्या संस्थेच्या इमारतीमधील सभागृहाला त्या काळच्या मुंबई सरकारमधील स्थानिक स्वराज्य खात्याचे माजी मंत्री गाेविंदराव धर्माजी उर्फ अण्णा साहेब वर्तक यांच्या नावे असलेल्या सभागृहाच्या इमारतीसह अन्यतही तीन इमारती आता पाडण्यात येणार आहे. या दाेन् इमारती तर अलिकडेच बांधलेल्या आहेत. त्यामध्ये प्रशासकीय इमारतीसह पदाधिकार्यांच्या निवासी इमारतीचा समावेश आहे.
जीर्ण व धाेकादाय झालेली जिल्हा परिषदेची मुख्य इमारत या आधीच पाडण्यात आलेली आहे. ठाणे महापालिकेने या इमारतीला धाेकादायक म्हणून घाेषीत केले हाेते. त्यामुळे काही महिन्यांनी या इमारतीला दाेन वर्ष्kपूवीर् पाडण्यात आले. आता उर्वरीत या इमारती पाडून तेथे भव्य टाॅवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील कायार्लयांना आता भाड्याच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यासाठी हालचाली सुरू आहे.
२० हजार स्केअर फुटाच्या इमारतीला भाड्याने घेण्यासाठी निविदा काढल्या आहेत. प्रथमवेळी प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा फेर निविदा काढल्या आहेत. तीन महिन्यात या कार्यालयांचे स्थलांतर करून इमारतीच्या बांधकामाला सुरूवात करण्याचे नियाेजन या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी लाेकमतला सांगितले.